लोकप्रिय रियॅलिटी शो ‘बिग बॉस’चा १५वा सीझन आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. शोमध्ये लवकरच फिनाले एपिसोड प्रसारित होणार आहे. अशा परिस्थितीत आता सर्व स्पर्धक फिनालेमध्ये आपापल्या जागेसाठी जोर लावताना दिसत आहेत. या आठवड्यात प्रेक्षकांना शोमध्ये प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला. एकीकडे रश्मी आणि देवोलीनाच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला. तर उमर आणि तेजस्वीची मैत्रीही तुटताना दिसली. दर आठवड्याप्रमाणे यावेळीही शोचा होस्ट सलमान खान (Salman Khan) याने कुटुंबीयांशी संवाद साधला. या वीकेंड का वार एपिसोडमध्ये सलमान चांगलाच रागावलेला दिसला. आठवडाभर घरातल्या भांडणांसोबतच त्याने राखी सावंतचा नवरा रितेशचीही शाळा घेतली.
सलमान खानने घेतली रितेशचा शाळा
रितेशला चेतावणी देताना, सलमानने रितेशचे पहिले लग्न आणि त्याची कथित पहिली पत्नी सोबतच्या घरगुती हिंसाचाराचा उल्लेख केला. सलमानने रितेशला उपरोधिकपणे सांगितले की, “तु-तडाकवरून हिंसाचारावर कधी गोष्ट येईल ते कळणारही नाही. वादाचे रुपांतर कधीही हिंसेमध्ये होऊ शकते.” सलमानचे हे बोलणे ऐकून आधी घरातील सदस्य गोंधळले, पण सलमान “रितेश हो ना?” असे म्हणताच घरातील बाकीच्यांना ही गोष्ट समजली.
सलमान रितेशला म्हणाला ‘आता एकदा वाचला..’
सलमान रितेशला म्हणाला, “हो ना रितेश ? याआधी तुझ्या आयुष्यात हिंसाचार झाला आहे ना, म्हणूनच तू आता इथे आला आहेस, म्हणून तुझ्याकडे ती स्ट्रीक आहे, इथे करून बघ, संपूर्ण इंडस्ट्री तिच्या (राखी) समर्थनात आहे, समजले? संपूर्ण भारत तिच्या पाठिंब्याला येईल, ही संधी देऊ नका, एकदा निसटला की समजून घ्या. मला हे इथे सांगायचे नव्हते, पण तू जबरदस्ती केलीस. तुला वाटले कोणालाच माहीत नाही, मला माहीत नाही?”
राखी म्हणाली ‘भीतीमुळे मी सर्व काही सहन करते’
सलमानने राखीला रितेशचे हे वागणे सहन करू नको असे सांगितले. राखीने सांगितले की, “भीतीमुळे मी सर्व काही सहन करते, कारण मला भीती वाटते की, तो मला सोडून दूर जाईल.” हे ऐकून सलमान म्हणाला, “तू राखी सावंत आहेस, तू हे का सहन करत आहेस, भीत राहिलीस तर तुला त्रास होत राहील.” राखीने सांगितले की, तो तिला घटस्फोट घेण्यासाठी ब्लॅकमेल करतो आणि तिला हे नाते वाचवायचे आहे.
सलमान राखीला म्हणाला, ‘गरज असेल तेव्हा मला फोन कर’
सलमान रागाने रितेशला म्हणाला, “आम्ही तुझा अपमान करण्याचा प्रयत्न करत नाही आहोत. हे तू स्वतःसाठी केले आहे. जेव्हा तू तुझ्या पत्नीशी आदराने बोलू शकत नाही तेव्हा तुझ्या शिक्षणाचा काय फायदा? राखी सावंतमुळे आम्ही तुला ओळखतो. ती पहिल्या किंवा दुसऱ्या सीझनमध्ये आली आणि येत राहिली, कारण बिग बॉसला तिची गरज आहे.” सलमान खानने राखी सावंतला असेही सांगितले की, रितेश कधी हिंसक झाला किंवा सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला, तर तिने सरळ त्याला फोन करावा.
हेही वाचा-