Saturday, June 22, 2024

‘तुम्ही संधी देण्याच्या लायकीचे नाही’, सलमान खानची ‘बिग बॉस १५’मधील स्पर्धकांवर आगपाखड

‘बिग बॉस १५’ दिवसेंदिवस मनोरंजक बनत चालला आहे. यावेळी वाईल्ड कार्ड स्पर्धक घरातील स्पर्धकांवर भारी पडत आहेत. सलमान खान स्पर्धकांच्या घरातील वागणुकीवर नेहमीच त्यांना बोलत असतात. या वीकेंडला देखील सलमान सगळ्यांची चांगलीच शाळा घेताना दिसणार आहे. याचा एक प्रोमो समोर आला आहे.

‘बिग बॉस १५’ च्या वीकेंडच्या वारचा एक प्रोमो समोर आला आहे. हा व्हिडिओ कलर टीव्हीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करून लिहिले आहे की, “असे काही झाले बिबी हाऊसमध्ये, सलमानने व्यक्त केली घरातील सगळ्या सदस्यांवर नाराजी. जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस १५.” (Bigg boss 15 tejasswi Parkash did not agree with Salman Khan see video )

या व्हिडिओमध्ये सलमान म्हणतो की, शोमधील जुन्या स्पर्धकांना बाकी सदस्यांना जागवण्यासाठी आणले आहे. हे बोलणे तेजस्वी प्रकाशला पटले नाही आणि ती सलमान खानला उत्तर देऊ लागली. यावर सलमान खान तिच्यावर खूप चिडतो.

यात सलमान खान म्हणतो की, “तुम्हाला जागे करण्यासाठी आम्हाला मागील वर्षाच्या स्पर्धकांना आणायला लागले आहे. इथे मला एकही विजेता दिसत नाही. सगळे एकाच पातळीवर आहेत आणि ती पातळी खूप खाली आहे. या पर्वात मला सगळे खोटे दिसतात.” यावर तेजस्वी म्हणते की, “इथे कोणताही एवढा मोठा अभिनेता नाहीये, जो खोटा अभिनय करू शकतो.”

सलमानला तेजस्वीचे हे बोलणे अजिबात आवडले नाही. तो तिला म्हणतो की, “तुम्ही लोक संधी देण्याच्या लायकीचे नाही आहात.” सलमान खानचे हे बोलणे ऐकून सगळेच शांत बसतात. हा प्रोमो पाहून पुढील एपिसोड रंजक असणार आहे, याचा अंदाज येत आहे. सगळेजण हा एपिसोड बघण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

नुकतेच सलमान खानचा ‘अंतिम’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद देखील मिळाला आहे. सध्या सलमान खान या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या वीकेंडला तो ‘बिग बॉस मराठी ३’ मध्ये चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी येणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस १५’मधील ‘या’ स्पर्धकावर राखी सावंतचा पती फिदा; प्रपोज केल्यानंतर राखीची रिऍक्शन पाहण्यासारखी

-शिल्पा राजच्या ‘बुलेट पे जीजा’ गाण्याने यूटुबवर उडवली धमाल, ५० मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार

-माधुरी दीक्षितने मारला गुजराती जेवणावर ताव, ढोकळा अन् भाकरवाडीचा लुटला आस्वाद

हे देखील वाचा