टेलिव्हिजन क्षेत्रातील प्रसिद्ध कार्यक्रम ‘बिग बॉसचा 16‘ सिजन खूपच लोकप्रिय झाला आहे. यामध्ये सतत काहीतरी नवीन पाहायला मिळत आहेत.गेल्या एक दोन आठवड्यापासून आपण घरामध्ये दोन ते तीन जोड्या पाहायला मिळाल्या होत्या मात्र, आता त्यामध्ये वादाची ठिणगी पेटलेली दिसून येत आहे. नुकत्या प्रदर्शित झालेल्या भागामध्ये प्रियंका चौधरी आणि अंकित गुप्ता यांनी करण जोहर ने घेतलेल्या टास्कमध्ये यांनी आपल्या नात्याची कबूली दिली होती मात्र, आता त्यांच्यामध्ये दुरावा आलेला दिसून येत आहे.
मंगळवार (दि.10 नोव्हेंबर) दिवशी प्रदर्शित झालेल्या भागामध्ये प्रियंका चौधरी (Priyanka Chahar Choudhary) आणि शालिन भनोट (Shalin Bhanot) यांच्यामध्ये जोरदार वाद पेटला होता. झाले असे की, अब्दु रोजिक (Abdu Rozik) याने शालिनची नक्कल केली होती, ज्यावर प्रियंका जोरजोरात हसली मात्र, शालिनला हे आवडले नाही आणि या छोट्याशा गोष्टीने दोघांमध्ये खूपच भांडण झाली. भांडण एवढे वाढले घरातील काही सदस्य आणि साजिद खान (Sajid Khan) यांनी या दोघांची समजूत देखिल काढली होती मात्र, तरिही प्रियंका सतत एकाच गोष्टीवरुन शालिनला भांडत होती.
प्रियंकाचे असे सतत शालिनसोबत भांडण करणे अंकितला आवडले नाही, आणि त्याने प्रियंकाला वाद मिटव, बस कर असे म्हणले, जे प्रियंकाला आजिबात पटले नाही, ज्यामुळे ती अंकितशी वाद घालते. या दोघांच्या भांडमामध्ये साजिद दोघांचीही समजूत काढण्याचा प्रयत्न करत असतो मात्र, भांडण अजूनच पेटते. तेव्ह प्रियंका म्हणते की, “मला वाटलं की, मी माझ्या मित्रासोबत या घरामध्ये आली आहे, मात्र, तु कधीच माझा मित्र न्हवतास, सोबतच ती म्हणते की, गेल्या दोन वर्षापासून मी याला सहन करत आहे.”
View this post on Instagram
प्रियंकाचे असे म्हणने अंकितला खूप टोचते तेव्हा तो तिला म्हणतो की, “तु मला नाही तर मी तुला झेलत आहे.” अशा प्रकारे दोघांमध्ये वाद पेटत जातो आणि दोघेही एकमेकांशी बोलने बंद करतात. बिग बॉसच्या घरामध्ये अंकित आणि प्रियंकाच्या जोडीला खूप चांगला प्रतिसाद मिळत होता मात्र, या भागानंतर यांचे नाते राहिल का तुटेल? हे पाहणे खूपच महत्वाचे ठरणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
संगीतकार होण्याचे नव्हे, तर ‘हे’ होते अनु मलिक यांचे खरे स्वप्न, जाणून घेऊया त्यांची संगीत क्षेत्रातील कामगिरी
‘या’मुळे कुमार सानू यांनी घेतला अनु मलिकचा बदला, ‘सा रे गा मा पा’मध्ये सांगितले कारण