छाेट्या पडद्यावरील लाेकप्रिय शाे ‘बिग बॉस 16‘मध्ये एक ना एक इमोशनल ड्रामा सुरूच असतो, ज्यामुळे बिग बाॅसच्या घरतील स्पर्धक चर्चेत राहतात. शोमधील गेममुळे, बहुतेक स्पर्धेक त्यांच्या भावना बाहेर येऊ देत नाहीत, परंतु या शनिवार (दि. 3 डिसेंबर) व रविवार (दि. 4 डिसेंबर) बिग बॉसने कुटुंबातील सर्व सदस्यांना त्यांचे मनातील भाव सांगण्याची संधी दिली. यानंतर घरातील सदस्य बिग बॉससोबत त्यांचे मनातील भाव शेअर करून भावूक होताना दिसले. त्याचवेळी प्रियंका चहर चौधरी आणि शिव ठाकरे यांनीही भावूक होत बिग बॉससोबत त्यांच्या कमजोरी शेअर केल्या.
शोच्या स्ट्राँग स्पर्धकांपैकी एक मानल्या जाणाऱ्या प्रियांका (priyanka chahar choudhary) हिनेही तिच्या आयुष्याशी संबंधित गोष्टी बिग बॉससमोर शेअर केल्या. तिने बिग बॉसला सांगितले की, “ती एक सामान्य मुलगी आहे आणि तिलाही लग्न करायचे आहे. त्याचवेळी ती तिच्या लव्ह लाईफबाबत बिग बॉससमोर खूप भावूक झाली. तिला अंकितसोबतच्या तिच्या लव्ह लाईफची काळजी वाटत होती. यासोबतच पुढे काम मिळणार की नाही, याचेही तिला टेन्शन येत होते.”
प्रियंका व्यतिरिक्त अंकित, टीना, शालीन आणि शिव देखील बिग बाॅससमाेर त्यांचे मन हलके करताना दिसले. शिव बिग बॉसला सांगतो की, “प्रत्येकाला वाटतं की, मी माझ्या डाेक्याने खेळतो, पण माझ्या घरच्यांना हे माहीत आहे की, मी माझ्या मनाचं ऐकतो, मी या लोकांसमोर रडूही शकत नाही.” यादरम्यान शिव खूप भावूक होतो. त्याचवेळी अर्चना गौतमने बिग बॉससमोर रडत सांगितले की, “तिने घराबाहेर कधीही कोणाचे मन दुखवले नाही आणि कधीही चुकीचे बोलले नाही, पण इथे आल्यानंतर ती खूप वेगळी झाली आहे.”
Promo ????
Emotional breakdown of HMs#BiggBoss16 #BB16pic.twitter.com/InXPIS4zWi
— ???????????????????????????? 'Sado na rees karo' (@bb16_lf_updates) December 3, 2022
सलमान खानने वीकेंड का वारमध्ये अनेक स्पर्धकांच्या गोष्टी उघड केल्या, ज्यामुळे प्रियांका आणि अंकितच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. त्याचवेळी टीना आणि शालीनला विचारलेल्या प्रश्नांनीही त्यांच्या नात्यात दुरावा आनला हाेता. वीकेंड का वार नंतर प्रियांका आणि अंकितचे नाते संपुष्टात येईल असे वाटत होते, पण तसे झाले नाही. प्रियांका, अंकित, टीना आणि शालीन आपलं नातं घट्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. (bigg boss 16 contestant share emotional feelings priyanka shiv thakare archana gautam cried)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
ब्रेकिंग! निर्माते नितीन मनमोहन यांना हृदयविकाराचा तीव्र झटका, रुग्णालयात उपचार सुरू
भोजपुरीची स्टार अभिनेत्री बनली मिया खलिफा, लेटेस्ट व्हिडिओवरून अक्षरा चाहत्यांकडून झाली ट्रोल