जेव्हा जेव्हा ‘बिग बॉस 16‘ची चर्चा होते तेव्हा अर्चना गौतमचे नाव समोर येते. अर्चना सीझन 16ची मनोरंजन पॅकेज होती. तिच्यामुळे शोला खूप टीआरपी मिळाला. ती टॉप 5 मध्येही पोहोचली होती. मात्र, याच दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अर्चना गौतम आणि त्याच्या वडिलांसोबत गैरवर्तन केले जात आहे. अभिनेत्री अर्चना गौतम आणि त्याच्या वडिलांवर एका गटाने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात अभिनेत्रीच्या वडिलांना मारहाणही करण्यात आली आहे. हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक गट अर्चना गौतम (Archana Gautam ) आणि त्याच्या वडिलांशी भांडण करत आहे. भांडण वाढताच गटाने अर्चना गौतमच्या वडिलांवर हल्ला केला. वडिलांना मारहाण करण्यात आली. अर्चना गौतमने हल्ल्यातून स्वतःला वाचवण्यासाठी प्रयत्न केले, परंतु तिलाही मारहाण झाली. अर्चना गौतमने या घटनेची तक्रार पोलिसांकडे केली आहे. पोलिसांनी आरोपींना शोधण्याचे काम सुरू केले आहे. या घटनेवर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेकांनी हल्ल्याचा निषेध केला आहे.
हा व्हिडिओ काँग्रेस कार्यालयाबाहेरचा असून हल्ला करणारे हे सर्व काँग्रेस कार्यकर्ते असल्याचे समजते. व्हिडिओच्या सुरुवातीला अर्चनाचे वडील जमिनीवर पडलेले दिसत आहेत. अर्चना तिच्या वडिलांचा बचाव करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्री ओरडताना आणि पाणी मागताना दिसत आहे. संसदेत महिला विधेयक मंजूर झाल्याबद्दल प्रियांका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांचे अभिनंदन करण्यासाठी अर्चना काँग्रेस पक्ष कार्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असल्याचे मानले जात आहे.
Bigg Boss 16 fame Archana Gautam and her father were allegedly beaten by the karyakartas of the Congress party.
They were stopped from entering the party office and were beaten at the gate itself.
Archana, who is a big supporter of the Congress party, was trying to enter the… pic.twitter.com/GeYV6YHfnl
— #BiggBoss_Tak???? (@BiggBoss_Tak) September 29, 2023
व्हायरल व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, अर्चना गौतम आणि तिच्या वडिलांना काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यांना पक्ष कार्यालयात प्रवेश करण्यापासून रोखून गेटवरच मारहाण करण्यात आली. अर्चना काँग्रेस पक्षाच्या मोठ्या समर्थक आहेत.
अर्चना गौतम ही एक भारतीय अभिनेत्री, मॉडेल आणि सौंदर्य स्पर्धा शीर्षक धारक आहे. ती मिस बिकिनी इंडिया 2018 ची विजेती आहे. ती 2022 मध्ये बिग बॉस 16 मध्ये देखील दिसली होती. (bigg boss 16 fame actress archana gautams father assaulted workers misbehaved outside congress office)
आधिक वाचा-
–‘जवान’च्या कमाईत मोठी घट, पण गाठला 100कोटींचा टप्पा; चित्रपटाचे एकूण कलेक्शन किती? वाचा
–कुशल बद्रिकेने केली नेटकऱ्यांकडे कळकळीची मागणी; म्हणाला, ‘त्रास होतोय..’