Sunday, December 3, 2023

‘खतरों के खिलाडी 13’च्या सेटवर अर्चना गौतमला झाली दुखापत, चेहऱ्याखाली द्यावे लागले ‘इकते’ टाके

चाहते स्टंटवर आधारित रिअॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी 13‘ ची आतुरतेने वाट पाहत आहेत. रोहित शेट्टीने होस्ट केलेल्या या शोचे शूटिंग सध्या दक्षिण आफ्रिकेत सुरू आहे. सर्व स्पर्धक फिनालेपर्यंत पोहोचण्यासाठी जाेरदार मेहनत घेत आहेत.  या दरम्यान अनेकांना स्टंट करताना खूप दुखापत झाली आहे. रोहित रॉय, ऐश्वर्या शर्मा, नायरा बॅनर्जी आणि अंजुम फकीह यांच्यानंतर आता या यादीत अर्चना गौतमच्या नावाचाही समावेश झाला आहे. तिच्या मानेवर जखमा झाल्या असून तिला टाके देखील पडले आहेत. अर्चनाला नेमके झाले तरी काय? चला, जाणून घेऊया…

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये अर्चना गौतम (archana gautam) हिला हनुवटीच्या खाली तीन टाके पडले आहेत. अशात देवोलिना भट्टाचार्जीने अर्चना गौतमच्या फोटोंवर प्रतिक्रिया दिली असून ती लवकरच बरी होईल अशी आशा व्यक्त केली आहे.

अर्चना गौतम बिग बॉस 16 पासून खूप लोकप्रिय झाली आहे. या शोमुळे तिला रोहित शेट्टीचा स्टंट आधारित शो मिळाला. या सगळ्यात ‘खतरों के खिलाडी 13’मध्ये शिव ठाकरे आणि अर्चना गौतम यांच्यात भांडण झाल्याच्या बातम्याही अलीकडे आल्या होत्या.

‘खतरों के खिलाडी 13’च्या या सीझनमध्ये डेझी शाह, अरिजित तनेजा, शीझान खान, रुही चतुर्वेदी, रोहित बोस रॉय, रश्मीत कौर, अंजली आनंद, शिव ठाकरे, ध्वनी मुफ्कीर, न्यारा एम बॅनर्जी, अर्चना गौतम, ऐश्‍वर शर्मा – डिनो जेम्स आदींचा समावेश आहे, तर राेहित शेट्टी या शाेला हाेस्ट करत आहेत. अशात सर्व स्टार्स दाक्षिण आफ्रिकेतून रंजक फाेटाे शेअर करत आहे, ज्यावरून अंदाज लावला जात आहे की, ते सर्व त्यांचा वेळ चांगल्यापद्धतीने घालवत आहे. मात्र, यासाेबतच शाेमध्ये स्पर्धक जखमी हाेताना देखील दिसत आहे. अशा परिस्थितीत यंदाच्या सीजनमध्ये ट्राॅफी काेणता स्पर्धक जिंकेल याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे.(khatron ke khiladi 13 archana gautam injured while performing a stunt got three stitches in her neck)

अधिक वाचा –
आणखी काय हवं! ‘बिग बाॅस 16’नंतर पालटलं शिव ठाकरेचं नशीब, वाचा नेमकं घडलंय तरी काय
कियाराने कार्तिकसाेबतचा ‘ताे’ फाेटाे केला शेअर, पण वादाच्या भाेवऱ्यात अडकण्याआधीच डिलीट केली पोस्ट

हे देखील वाचा