सलमान खान होस्ट करणाऱ्या ‘बिग बॉस ओटीटी 2’ने नुकतेच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. ‘बिग बॉस’चा प्रचंड मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. ‘बिग बॉस 16′ चे पर्व प्रचंड गाजले आहे. प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादव ‘बिग बॉस ओटीटी 2’ शोचे हे विजेतेपद पटकावले आहे. विशेष म्हणजे, यासह तो ‘बिग बॉस’च्या इतिहासात वाईल्ड कार्ड एन्ट्री करून विजेतेपद जिंकणारा पहिलाच स्पर्धक ठरला. त्यानंतर आता प्रेक्षकांचे लक्ष ‘बिग बॉस’च्या 17वे पर्व कधी येणार याकडे लागले आहे. ‘बिग बॉस’च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
जेव्हा विजेतेपद जिंकून एल्विश घरी पोहोचला, तेव्हा त्याचे जंगी स्वागत कण्यात आला आहे. त्याच्या स्वागतासाठी 1001 गाड्यांचा ताफा सज्ज होता. आता ‘बिग बॉस’च्या 17व्या (Bigg Boss) पर्वाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्याच वेळी, निर्मात्यांनी कलर्सवर ‘बिग बॉस 17’ आणण्याची तयारी सुरू केली आहे. बिग बॉस नेहमीच सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान कलर्सवर सुरू होते.
त्याच वेळी, बिग बॉसशी संबंधित फॅन क्लब पेजवर त्याचे काही तपशील शेअर करण्यात आले आहेत. त्यानुसार हा शो 15 सप्टेंबरच्या सुमारास टीव्हीवर प्रसारित होणार असल्याचे बोलले जात आहे. म्हणजेच, आजपासून 24 दिवसांनी सलमान खान त्याच्या बिग बॉस 17 या शोद्वारे पुन्हा टीव्हीवर धूम ठोकणार आहे. पण निर्मात्यांनी अद्याप याबद्दल कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही.
‘बिग बॉस 17’ मध्ये कोणते कलाकार झळकणार?
टबिग बॉस 17टमध्ये कोणते कलाकार दिसणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. माध्यमातील वृत्तानुसार, या रिअॅलिटी शोच्या सीझन 17साठी दोन नावे सध्या चर्चेत आली आहेत. ‘खतरों के खिलाडी 13’ ची अंतिम फेरीतील ऐश्वर्या शर्मा आणि UK07 रायडर उर्फ अनुराग डोवाल यांची नावे चर्चेत आहेत. याशिवाय ‘बिग बॉस 17’मध्ये टीव्हीचे अनेक प्रसिद्ध चेहरे देखील दिसू शकतात. यामध्ये दिव्यांका त्रिपाठी, मनीषा राणी, जेनिफर विंगेट यांच्या नावांचा समावेश आहे. (Bigg Boss 17 hosted by Salman Khan will be coming soon Which actors will be seen)
अधिक वाचा-
–धक्कादायक! उर्फी जावेदला जिवे मारण्याची धमकी; अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्या आयुष्यातील रोज…’
–एक्सप्रेशन क्वीन असणाऱ्या रिंकूचे फोटो पाहून नेटकरी घायाळ, दिसल्या अनोख्या पोझ