Tuesday, September 26, 2023

धक्कादायक! उर्फी जावेदला जिवे मारण्याची धमकी; अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्या आयुष्यातील रोज…’

प्रसिद्ध अभिनेत्री उर्फी जावेदला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. उर्फीने तिच्या कपड्यांमुळे सतत सोशल मीडियावर चर्चेत येत असते. उर्फी नेहमी वेगवेगळ्या लूकमध्ये दिसते. त्यामुळे तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जाते. उर्फी सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करते. जे नेहमीच चर्चेत येतात. सद्धा उर्फी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

उर्फीची (Urfi Javed) फॅशन स्टेटमेंट खूप बोल्ड आणि ग्लॅमरस आहे. अनेकवेळा तिच्या या फॅशन सेन्समुळे ती अडचणीतही येत असते. शिवाय तिला खूप ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागत आहे. आता एका यूजरने उर्फीला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. उर्फी जावेदने ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे. उर्फी या आगोदर पण अनेकदा असे बोलण्यात आले आहे.

या पोस्टमध्ये एका ट्रोलरने लिहिले आहे की, ‘लवकरच तुम्हाला गोळ्या घातल्या जातील. लवकरच मिशन पूर्ण होईल, तुम्ही भारतात पसरलेली सर्व घाण साफ केली जाईल.’ या पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर करत उर्फीने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘माझ्या आयुष्यातील रोजचा दिवस आहे.’

आता उर्फीची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. तसेच, अभिनेत्री अशा धमक्या आणि ट्रोलिंगला बळी पडणे ही काही मोठी गोष्ट नाही. अनेकदा ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर येते. मात्र, वेळोवेळी उर्फीही तिच्या बोल्ड स्टाईलमध्ये ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देते.

उर्फी जावेद विषयी बोलायच झाले तर, उर्फी ‘बिग बॉस ओटीटी‘च्या पहिल्या सीझनमध्ये दिसली. त्यावेळी ती खूप प्रसिद्धी झाली. उर्फीने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘बेपन्ना’, ‘भैया की दुल्हनिया’ आणि ‘मेरी दुर्गा’ या सारख्या अनेक टीव्ही मालिकांमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या आहे. (Famous actress uorfi javed received death threat actor said regular day in my life)

अधिक वाचा- 
एक्सप्रेशन क्वीन असणाऱ्या रिंकूचे फोटो पाहून नेटकरी घायाळ, दिसल्या अनोख्या पोझ
‘अभिनेता म्हणून टुकार आहेच, पण…’; राहुल गांधींवरील ‘त्या’ टीकेला कॉंग्रेसची तिखट प्रतिक्रिया

हे देखील वाचा