‘बिग बॉस १४’ रनरअप राहुल वैद्य लवकरच अडकणार लग्न बंधनात, चाहत्यांच्या उत्सुकतेने गाठले शिखर

Bigg boss fame Rahul Vaidya will married soon


प्रसिद्ध बिग बॉस 14 चा स्पर्धक आणि रनरअप विजेता राहुल वैद्य हा बिग बॉसच्या घरात राहिल्यामुळे तो प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय झाला आहे. राहुलने भलेही हा शो जिंकला नसेल परंतु प्रेक्षकांची मने जिंकण्यात तो कुठेही कमी पडला नाही. घरात असताना राहुल आणि दिशा परमार यांनी एकमेकांसोबत आयुष्य जगायचा निर्णय घेतला. त्यामुळे ते दोघेही केव्हा लग्न करणार आहेत, याबाबत त्यांच्या चाहत्यांमध्ये खूपच उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे राहुलने त्याच्या लग्नाबाबत असणारे प्लॅन्स सांगितले आहेत.

बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर राहुल वैद्यबद्दल अनेक चर्चा होत होत्या. तो आपल्या लव्ह लाईफबद्दल लाईम लाईटमध्ये असतो. त्याचे सगळे चाहते त्यांच्या लग्नाची तारीख जाणून घेण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. माध्यमांसोबत बातचीत करताना राहुलने सांगितले होते की, तो याच वर्षी लग्न करणार आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, राहुल आणि दिशा येत्या 2 ते 3 महिन्यात लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. मागे एका मुलाखतीमध्ये राहुलने असे सांगितले होते की, त्याच्या आईला वाटते त्याने या जून महिन्यातच लग्न करावे. परंतु अजूनही लग्नाची तारीख निश्चित झाली नाहीये.

दिशा आणि राहुल हे एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसत आहेत. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर राहुलच्या फॅन्समध्ये कितीतरी पटीने वाढ झालेली दिसत आहे. तो जिथे जाईल तिथे सगळे त्याच्या भोवती जमा होतात. अशातच त्याने दिशासोबत वेळ घालवण्यासाठी एका खाजगी हेलिकॉप्टरची मदत घेतली आहे. राहुलने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा फोटो शेअर करून ही माहिती दिली आहे.

व्हॅलेंटाईनडेच्या दिवशी दिशा राहुलला भेटायला बिग बॉसच्या घरात आली होती, तेव्हाच राहुलने सलमान खानला त्यांच्या लग्नाचे आमंत्रण दिले होते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बिकीनीत फोटो पाहायचे असेल तर केवळ मौनी रॉयचेच! पाहा मौनीच्या घायाळ करणाऱ्या अदा

-क्या बात! नोरा फतेही बरोबर थिरकले चिमुकलीचे पाय, ‘दिलबर’ गाण्यावर केला अफलातून डान्स

-‘मिल्की’ गाण्यावर सपना चौधरीने लावले ठुमके! गाण्यातील अदा पाहून चाहतेही झाले दंग


Leave A Reply

Your email address will not be published.