Friday, August 1, 2025
Home मराठी आहा…कडकच ना! शिव ठाकरेचा व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल, दिसतोय एकदम स्टायलिश

आहा…कडकच ना! शिव ठाकरेचा व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल, दिसतोय एकदम स्टायलिश

टेलिव्हिजनवरील ‘बिग बॉस’ हा सर्वांचा लोकप्रिय शो आहे. हिंदीमधील या शोची लोकप्रियता बघता हा शो मराठीमध्ये देखील सुरू केला गेला आहे. मराठीमध्ये या शोचे दोन सिझन पूर्ण झाले आहेत. यातील सर्वात चर्चेत दुसरा सिझन आणि यातील स्पर्धक होते. या शोमधील सर्वांचाच लाडका आणि विजेता स्पर्धक म्हणजे शिव ठाकरे. शिव ठाकरे हा बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता होता. त्यानंतर तो खूप चर्चेत आला होता. शिव सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. अशातच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

शिवने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो स्टायलिश लूकमध्ये दिसत आहे. त्याने हिरव्या आणि पिवळ्या रंगाची पँट आणि शर्ट घातलेला आहे. यासोबत त्याने पायात पांढऱ्या रंगाचे शूज घातले आहेत. या लूकमध्ये तो स्टायलिश दिसत आहे.

शिवचा हा अंदाज त्याच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. अनेकजण या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. त्याच्या एका चाहत्याने “स्वॅग,” अशी कमेंट केली आहे, तर आणखी एकाने “कडक,” अशी कमेंट केली आहे. अनेकजण त्याच्या या व्हिडिओवर हार्ट ईमोजी पोस्ट करत आहेत. त्याचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. (Bigg boss fame shiv thakare’s stylish look viral on social media)

शिवने याआधी एमटीव्हीवरील ‘रोडीज’ या शोमध्ये भाग घेतला होता. त्यानंतर तो ‘बिग बॉस’मुळे खूप चर्चेत आला होता. या शोमध्ये त्याचे आणि वीणा जगतापचे अफेअर खूप गाजले होते. या शोमध्ये त्याने त्याच्या प्रेमळ आणि मनमिळावू स्वभावाने घरातील सदस्यांचे मन जिंकून घेतले होते. तसेच त्याने सगळ्या प्रेक्षकांचे देखील मन जिंकली होती. त्यामुळेच तो बिग बॉसच्या‌ दुसऱ्या सिझनचा विजेता ठरला होता. मागील काही दिवसांपूर्वी त्याचे ‘शिलावती’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सैराट’ फेम आर्चीच्या लूकमध्ये आलाय कमालीचा बदल; चाहत्यांकडून थेट श्रीदेवींशी केली जातेय तुलना

-‘गुलाबाची कळी’ तेजस्विनी पंडितचा सुंदर लूक पाहून कलाकारांसोबत चाहतेही झाले ‘शायर’, म्हणतायत…

-‘इंडियन आयडल १२’च्या ग्रँड फिनालेने टेलिव्हिजन विश्वात नोंदवला ‘हा’ खास विक्रम; टीमने आनंद साजरा केला

हे देखील वाचा