‘एक वर्ष रेसलिंग करा आणि मग इकडे या’, टास्कवरून चिडलेल्या मीराने दिले विकासला उत्तर


बिग बॉस मराठी‘ (Bigg Boss Marathi) च्या घरातील खेळ आता अटीतटीचा झाला आहे. घरात आता सात सदस्य उरले आहेत. त्यामुळे आता सगळेच जिंकण्याच्या दिशेने प्रवास करत आहेत. आता मैत्रीप्रेम मागे ठेवून प्रत्येकजण ज्याचा त्याचा खेळ आहेत. मागील आठवड्यात घरातून गायत्री दातार (Gayatri Datar) बाहेर पडली आहे. त्यानंतर आता सगळेच मनापासून खेळ खेळत आहेत. येत्या काही दिवसातच हा शो प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. २६ डिसेंबर रोजी या शोचा ग्रँड फिनाले होणार आहे. अशातच हा आठवडा खूपच रंगतदार असणार आहे. घरात बिग बॉसचा वाढदिवस आहे. त्यामुळे घरात या निमित्त वेगवेगळे टास्क घेतले जाणार आहेत. घरात नॉमिनेशन टास्क रंगणार आहे.

या आठवड्यात मीनल शाह घराची शेवटची कॅप्टन झाली आहे. त्यामुळे या आठवड्यात कोण सेफ असणार आणि कोण घराबाहेर जाणार हा निर्णय मीनल घेणार आहे. या प्रक्रियेत मीनल सेफ झाली असून तिच्या जवळील ६ लाख रुपये देखील सेफ आहेत. विजेत्याला मिळणारी रक्कमेमधील तिच्याजवळ असणारी रक्कम सेफ झाली आहे. (Bigg Boss Marathi 3 : meera and vikas converstion about nomination task)

अशातच कलर्स मराठीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये आपण पाहू शकतो की, विकास आणि मीरामध्ये नॉमिनेशन टास्कवरून चर्चा चालू आहे. यावेळी मीरा विकासला म्हणते की, “मला खरं सांग मी काहीच खेळले नाही का?” यावर विकास उत्तर देतो की, “आता इथे असलेला प्रत्येकजण विनर होऊ शकतो.” यावर मीरा म्हणते की, “तुझ्या लिस्टमध्ये मी कधी नव्हतेच, इथे फक्त टास्कमधले निकष लावताय. मग मी पण उद्या सगळ्यांना सांगेन एक वर्ष तुम्ही रेसलिंग करा आणि मग इकडे या.”

त्यांच्या या संभाषणावरून हे लक्षात येत आहे की, मिनलने मीराला या आठवड्यात नॉमिनेट केले आहे. त्यामुळेच ती एवढी चिडली आहे. त्यामुळे आता येणार एपिसोड पाहण्यासाठी मजा येणार आहे यात काही शंकाच नाही.

हेही वाचा :

‘सुंदरा मनामध्ये भरली’मधील आणखी एका अभिनेत्रीने घेतला मालिकेचा निरोप, कारण अजूनही गुलदस्त्यात

‘हमारा आदमी का ढाप्या नहीं है’, म्हणत हेमांगी कवीने केला तिचा रावडी लूक शेअर

मिस युनिव्हर्सला मिळतात अनेक अमूल्य आणि अविश्वसनीय सुविधा, वाचाल तर थक्कच व्हाल

 


Latest Post

error: Content is protected !!