बिग बॉस मराठीचा यंदाचा सिझन चांगलाच गाजतोय. यामध्ये धनंजय पोवार देखील सहभागी झाला आहे. धनंजय हा मिडिया इन्फ्ल्यूएन्सर आहे. त्याच्या स्वभावाने घरात तो सर्वांची माने जिंकून घेत आहे. घरात सगळेजण त्याला डीपी असं म्हणत आहेत. तिथेच चाहते सुद्धा धनंजयला पूर्ण सपोर्ट करताना दिसत आहेत.
मात्र धनंजयची आई आणि बायको यांनी बिग बॉसच्या टीमवर नाराजी व्यक्त केली आहे. बिग बॉसची टीम धनंजयचं फुटेज दाखवत नाहीये असा दावा धनंजयच्या कुटुंबीयांनी केला आहे. धनंजयच्या सोशल मिडिया अकाउंट वरून एक व्हिडीओ शेयर करण्यात आला आहे. या व्हिडीओत धनंजयची पत्नी म्हणत आहे की, काल जान्हवीने धनंजयला सेफ केलं, तेव्हा जान्हवी जनतेला म्हणाली की त्यांचा खेळ आहे. दिवसभर आम्ही गेम प्लान बद्दल चर्चा करत होतो. पण ती चर्चा कुठे दाखवलीच नाही.
धनंजयच्या पत्नीने अंकिताने डीपीला नॉमीनेट केल्याबद्दल सुद्धा खंत व्यक्त केली आहे. अंकिताने डीपीला नॉमीनेट केलेलं मला पटलं नाही. असं त्या डीपीच्या आईला म्हणतात. मग डीपीच्या आई म्हणतात मला तर अजिबातच पटलेलं नाही. खरतर तिने वैभवमुळे धनंजयला नॉमीनेट केलं, त्यानंतर डीपीच्या पत्नी म्हणतात. त्यांचा गेम सुधारावा म्हणून त्यांना नॉमीनेट केलं असं म्हणाल्या पण हे कारण मला पटलेलं नाही.
याशिवाय देखील धनंजयची आई आणि पत्नी यांनी बिग बॉस वर आरोप सुद्धा केले आहेत. धनंजयचं फुटेज दाखवत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.डीपीच्या आई म्हणतात, अंकिताने डीपीला नॉमीनेट केलेलं मला पटलेलं नाही जनतेला पटतंय का ? हे त्यांनी सांगावं. शिवाय जेव्हा धनंजय गेम कसा खेळायचा त्याचं प्लानिंग सांगत असतो.तेव्हा फोकस त्याच्यावर करतच नाहीत. हि काय भानगड आहे ? अनसीन अनदेखा मध्ये दाखवतात मग बिग बॉसच्या घरात का दाखवत नाहीत. असे अनेक प्रश्न दोघींनी मांडले आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –
विजय वर्मा यांनी बिग बींचे केले कौतुक; म्हणाला की, ‘ते सेटवर येतात आणि सर्वांना वेळ देतात…’