Saturday, April 18, 2026
Home मराठी जान्हवीच्या समर्थनार्थ धावून आल्या जाऊबाई संध्या किल्लेकर; रितेश आणि बिग बॉस अनफेयर आहे…

जान्हवीच्या समर्थनार्थ धावून आल्या जाऊबाई संध्या किल्लेकर; रितेश आणि बिग बॉस अनफेयर आहे…

मागील काळात बिग बॉस मध्ये जान्हवी किल्लेकर चर्चेत होती. तिने पंढरीनाथ कांबळे यांचा अपमान केल्यामुळे होस्ट रितेश देशमुख याने जान्हवीची खरडपट्टी काढली होती. भाऊचा धक्का या आपल्या सेगमेंट मध्ये रितेशने जान्हवीला एक आठवडा जेल मध्ये राहण्याची शिक्षा सुनावली होती. त्याच बरोबर या सेगमेंट मध्ये तिला एन्ट्री नसल्याचे सुद्धा रितेश म्हणाला होता. मागील आठवड्यात रितेशने तिला या कार्यक्रमात स्थान सुद्धा दिले नव्हते. आता यावरून जान्हवीच्या जाऊने प्रतिक्रिया दिली आहे. 

जान्हवीच्या जाऊबाई संध्या किल्लेकर यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये बिग बॉस आणि रितेशला ते अनफेयर आहेत असं त्या म्हणाल्या आहे.   

संध्या किल्लेकर म्हणाल्या…

“घरातील वस्तूंची आदळाआपट करून Bigg Boss House चे नियमभंग करणाऱ्याला शिक्षा तर नाहीच पण भाऊच्या धक्क्यावर स्थान आहे…”

टास्कमध्ये आक्रमकता दाखवून Physically Violent होण्याला शिक्षा तर नाहीच पण भाऊच्या धक्क्यावर स्थान आहे.”

घरातील एका सदस्यावर शिवीगाळ करून Bip Bip… ऐकू येऊनही त्यावर शिक्षा तर सोडा पण, साठी चर्चाही नाही पण भाऊच्या धक्क्यावर स्थान आहे.

आणि जान्हवीने केलेल्या चुका तिने मान्य करूनही, घरातील व प्रेक्षकांची मनापासून माफी मागुनही प्रामाणिकपणे आठवडाभर शिक्षा भोगूनही भाऊच्या धक्क्यावर स्थान नाहीं

हे खरंच खूप Unfair आहे जान्हवीसाठी घरातील इतर सदस्यांप्रमाणे तिलाही भाऊच्या धक्क्यावर बसण्याचा तितकाच अधिकार आहे.”

१ आठवडा शिक्षा भोगून सुद्धा भाऊच्या धक्क्यावर स्थान मिळालं नाही. पण तुझ्या strong, fair & individual गेमने प्रेक्षकांच्या मनात तू पून्हा जागा मिळव.we will always support you. असं संध्या किल्लेकर यांनी पोस्ट मध्ये म्हणलं आहे. या पोस्ट मधून कदाचित त्यांचा रोख अरबाझ आणि निक्की यांच्यावर दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा –

700 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला ‘स्त्री 2’, पाहा श्रद्धा कपूरच्या चित्रपटाचे जगभरातील कलेक्शन

हे देखील वाचा