Thursday, June 13, 2024

‘बिग बॉस मराठी’च्या ग्रँड फिनालेसाठी डान्सचा सराव सुरू, एलिमिनेट झालेल्या स्पर्धकांचा व्हिडिओ आला समोर

बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व संपण्यास आता केवळ ५ दिवस राहिले आहेत. घरातील तसेच घराबाहेर गेलेले सगळे स्पर्धक आता फिनालीची तयारी करत आहेत. फिनालेला बिग बॉसच्या मंचावर सगळ्यांचे डान्स होतात. त्यामुळे आता घरा बाहेर असलेल्या स्पर्धकांचा डान्स सराव सुरू झाला आहे. तसेच घरातील सदस्य देखील आता फिनालेच्या दृष्टीने प्रवास करत आहेत. बाहेरील स्पर्धक त्यांच्या डान्सचा सराव करत आहेत. अशातच शोमधील स्पर्धक आदिश वैद्य आणि गायत्री दातार यांचा डान्स सरावा व्यतिरिक्त एक व्हिडिओ समोर आहे.

आदिश हा बॅकग्राऊंड डान्सरसोबत ‘हवा मै उडती जाये’ या गाण्यावर डान्स स्टेप्स करत असतात. त्यांच्या डान्स स्टेप्स खूप क्लीन असतात. त्यांचा हा सुंदर डान्स चालू असताना मधेच गायत्री येते आणि कसाही वेडावाकडा डान्स करायला सुरुवात करते. तिचा या डान्स व्हिडिओ पाहून आदिश आणि बाकी डान्सर देखील कसाही डान्स करू लागतात. त्यांचा हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (bigg boss marathi contestent adish vaidya and gayatri datar dance video on instagram)

त्यांचा हा व्हिडिओ पाहून आता फिनालेमध्ये सगळ्यांचे जोरदार डान्स पाहायला मिळणार आहेत, यात काही शंका नाही. बिग बॉस मराठीच्या घरात आता केवळ ६ स्पर्धक उरले आहेत. घरात आता जय, उत्कर्ष, मीनल, मीरा, विकास, विशाल हे स्पर्धक राहिले आहेत. त्यामुळे आता कोण विजेता होईल याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. घरात नुकतेच पत्रकार परिषद झाली आहे.

त्यावेळी स्पर्धकांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. स्पर्धकांनी देखील सगळ्या प्रश्नांना खूप चांगली उत्तर दिली. तसेच या आठवड्यात मधे आणखी एक एलिमिनेशन होणार आहे आणि या शोचे टॉप ५ स्पर्धक जाहीर केले जाणार आहे. घरात विशालला आधीच तिकीट टू फिनाले मिळाले आहे.

हेही वाचा :

‘फुलाला सुगंध मातीचा’ मधील कीर्ती आणि एमिलीचा डान्स व्हिडिओ पाहिलात का? ‘लेझी लॅड’वरील व्हिडिओ व्हायरल

स्क्विड गेमपासून ते हेलबाऊंडपर्यंत या आहेत २०२१मधील सर्वात लोकप्रिय कोरियन सीरिज

‘आम्ही डान्स करण्याची एकही संधी सोडत नाही’, म्हणत अंतरा आणि मल्हारने लावले ट्रेंडिंग गाण्यावर ठुमके

 

 

हे देखील वाचा