‘फुलाला सुगंध मातीचा’ मधील कीर्ती आणि एमिलीचा डान्स व्हिडिओ पाहिलात का? ‘लेझी लॅड’वरील व्हिडिओ व्हायरल


आपल्या समाजात अशी अनेक माणसं आजही आहेत, ज्यांच्या मते मुलींनी केवळ चूल आणि मूल एवढंच संभाळल पाहिजे. परंतु टेलिव्हिजन मालिका नेहमीच जनजागृतीचे काम करत असतात. समाजातील वाईट गोष्ट पुसून लोकांना चांगला संदेश देणे ही भूमिका टेलिव्हिजन गेले अनेक वर्ष करत आहेत. अशीच स्टार प्रवाहवर ‘फुलाला सुगंध मातीचा‘ ही मालिका आहे. 

मालिकेची कहाणी वेगळी आणि डोळ्यात लाखो स्वप्न असणाऱ्या एका मुलीभोवती फिरते. जिला शिकण्याची इच्छा असते, परंतु सासरचे लोक तिला शिकण्याची आणि पोलीस अधिकारी होण्याची संधी देत नाहीत. मालिकेत समृद्धी केळकर मुख्य भूमिकेत आहे. ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. मालिकेच्या सेटवरील अनेक फोटो आणि व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच मालिकेतील लाडकी कीर्ती आणि एमिली यांचा एक डान्स व्हिडिओ समोर आला आहे. (fulala sugandh maticha fame actress samruddhi kelkar and madhura joshi’s dance video on instagram)

समृद्धीने अलीकडेच तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये समृद्धी आणि मधुरा जोशी या दोघी ‘लेझी लॅड’ या गाण्यावर डान्स करत आहेत. दोघीही त्यांच्या मालिकेतील पोशाखात दिसत आहेत. दोघी या गाण्याच्या डान्स स्टेप्स फॉलो करत आहेत. अनेकजण या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. मालिकेतील या दोन अभिनेत्रीचा डान्स सगळ्यांना खूप आवडला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत समृद्धी केळकर आणि हर्षद अटकरी मुख्य भूमिकेत आहे. हर्षदने या आधी ‘दुर्वा’, ‘अंजली’, ‘सारे तुझ्याचसाठी’ या मालिकेत काम केले आहे. तर समृध्दीने ‘लक्ष्मी सदैव मंगलम’ या मालिकेत काम केले आहे. त्यांची ‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका हिंदीमधील ‘दिया और बाती हम’ या मालिकेचा रिमेक आहे. हिंदीमध्ये देखील ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती.

हेही वाचा :

बॉलिवूडचा ‘हिरो नं १’ गोविंदाला मुंबईच्या ताज हॉटेलने ‘या’ कारणासाठी नाकारली होती नोकरी

‘आम्ही डान्स करण्याची एकही संधी सोडत नाही’, म्हणत अंतरा आणि मल्हारने लावले ट्रेंडिंग गाण्यावर ठुमके

स्क्विड गेमपासून ते हेलबाऊंडपर्यंत या आहेत २०२१मधील सर्वात लोकप्रिय कोरियन सीरिज

 

 


Latest Post

error: Content is protected !!