Friday, April 26, 2024

‘बिग बॉस मराठी ३’च्या घरातील एक नवी खोली होणार अनलॉक, सदस्यांना मिळाले मोठे सरप्राईज

‘बिग बॉस मराठी ३’च्या घरात रोज वेगवेगळ्या आणि नवीन गोष्टी पाहायला मिळत आहेत. अशातच घरात पहिल्या आठवड्यातील पहिले साप्ताहिक कार्य पूर्ण झाले आहे. यात उत्कर्ष शिंदे हा विजेता झाला आहे. बिग बॉसने त्याला या आठवड्यात त्याच्यासोबत एका महिला सदस्याला सहविजेती म्हणून घोषित करण्याचा खास अधिकार दिला आहे. यावेळी त्याने मीरा जग्गनाथ हिचे नाव घेतले. या दोघांमध्ये आता कॅप्टन पदासाठी डाव रंगणार आहे.

या सोबत ‘बिग बॉस मराठी’ने घरातील एक खोली अनलॉक केली आहे. या खास खोलीचे महत्त्व तसेच फायदा देखील सांगितला आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या इतिहासात पहिल्यांदाच या खोलीचा वापर केला जाणार आहे. हे स्पर्धकांसाठी एक खास सरप्राईज आहे. (Bigg Boss Marathi season 3, temptation room unlock, bigg Boss told about surprise)

बिग बॉसने घरातील टेम्प्टेशन रूमचे दर्शन सर्व सदस्यांना दिले आहे. यासोबत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. या खोलीमध्ये एक फोनबूथ आहे. ज्याद्वारे स्पर्धक बाहेरच्या जगातील कोणत्याही जवळच्या व्यक्तीसोबत संपर्क साधू शकतात. तसेच खोलीमध्ये विविध चविष्ट पदार्थ आहेत, जे बिग बॉसच्या घरात मिळत नाहीत. तसेच एक बायोस्कोप आहे. ज्याद्वारे सदस्य संपूर्ण घरात डोकावू शकतात. यासोबत पावर कार्ड आणि बुक ऑफ टेम्प्टेशनची देखील माहिती दिली. परंतु याबाबत संपूर्ण माहिती अजूनही गुलदस्त्यातच आहे.

दर आठवड्यात कॅप्टनसी डाव रंगणार आहे. यामध्ये जो कोणी विजेता होईल, त्याला कॅप्टन पद किंवा टेम्प्टेशन रूम या पैकी एकाची निवड करण्याचे स्वातंत्र्य असणार आहे. त्यावेळी उरलेली दुसरी गोष्ट उपविजेत्याच्या नावे होणार आहे. या सगळ्या गोष्टी ऐकून स्पर्धकांना खूप आनंद झाला आहे. यासाठी आता मीरा आणि उत्कर्ष यांच्यामध्ये खेळ रंगणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कृष्णा अभिषेकने असे काय केले की, नेहा कक्करला कोसळले रडू? पाहा ‘हा’ व्हिडिओ

-‘आम्ही दोघांनी अजूनही लग्न नाही केले’, म्हणत सलमान खानने केला आयुष्यातील खऱ्या प्रेमाचा खुलासा

-TMKOC: एकेकाळी कर्जात पूर्णपणे बुडाला होता ‘सोढी’; मग कर्जदारांपासून वाचण्यासाठी केलं ‘हे’ काम

हे देखील वाचा