Friday, September 20, 2024
Home टेलिव्हिजन सातारचे कविवर्य अभिजित बिचुकलेंची होणार बिग बॉस मराठीच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री; मनोरंजनाचा डोस वाढणार…

सातारचे कविवर्य अभिजित बिचुकलेंची होणार बिग बॉस मराठीच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री; मनोरंजनाचा डोस वाढणार…

बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतोय घरातील सदस्यांच्या होणाऱ्या वादामुळे हा सिझन सध्या चर्चेत आहे. इथे दरवेळी काही न काही मजेदार गोष्टी घडत आहेत ज्यामुळे प्रेक्षकांचं मनोरंजन होतंय. कधी प्रेम तर कधी भांडण. घरात आधीच दोन ग्रुप झाले आहेत.आता लवकरच घरात एक वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे.

सोशल मिडीयावर मात्र हि एन्ट्री कुणाची होणार आहे याची उत्सुकता लागून राहिलेली आहे. अनेक नावे यात समोर येत आहेत. यापूर्वी हिंदुस्थानी भाऊ आणि सुमित पाटील घरात एन्ट्री घेणार असल्याच्या चारच्या रंगल्या होत्या. मात्र आता एक नवीन नाव याठिकाणी समोर येतंय. आणि ते नाव म्हणजे सातारचे नेते अभिजित बिचुकले. 

अभिजित बिचुकले हे कायम वादातीत असतात. त्यांचे नाव कायम चर्चेत असते. वादग्रस्त विधानांसाठी ते प्रसिद्ध आहेत. बिग बॉस हिंदी मध्ये देखील ते गेले होते. मात्र तिथून ते त्यांच्या वादग्रस्त स्वभावामुळे बाहेर पडले होते. आता बिग बॉस मराठीच्या घरात येऊन ते कुणाशी पंगा घेतात ते बघण्यासारखे असेल. 

दरम्यान सध्या बिग बॉस मध्ये भाऊचा धक्का बसणार आहे.  यात रितेश देशमुख घरातील सदस्यांची खरडपट्टी काढणार आहे. रितेशने यावेळी सुरज चव्हाणची प्रशंसा केली आहे. आता त्यावरून रितेश घरातील कोणत्या सदस्याला फैलावर घेणार हे बघावे लागेल.    

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा –

शेर अकेला ही आता हैं… रीतेश कडून सूरजवर कौतुकाचा वर्षाव

 

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा