सध्या सलमान खान त्याच्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमामुळे चांगलाच गाजत आहे. बऱ्याच दिवसांनी सलमान या सिनेमाच्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. मागील अनेक दिवसांपासून या सिनेमाने मोठा बज निर्माण केला असून, आता सर्वानाच सिनेमाच्या प्रदर्शनाची प्रतीक्षा आहे. या सिनेमाचा टिझर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. त्यानंतर सिनेमाच्या पहिल्या गाण्याने देखील प्रेक्षकांवर भुरळ घातली होती. आता या सिनेमातील दुसरी गाणे प्रदर्शित करण्यात आले ते.
‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातील दुसरे ‘बिल्ली बिल्ली’ हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या गाण्याची मागील अनेक दिवसांपासून प्रेक्षकांना प्रतीक्षा होती. आता हे शानदार पार्टी सॉंग प्रदर्शित झाले आहे. काही दिवसांपूर्वीच या गाण्याच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली होती. नुकतेच रिलीझ झालेल्या ‘बिल्ली बिल्ली’ या गाण्यात सिनेमातील संपूर्ण स्टारकास्ट पूजा हेगड़े, शहनाज गिल, भूमिका चावला, साऊथ सुपरस्टार वेकेंटश दग्गुबाती, पलक तिवारी, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल आणि इतर कलाकार दिसत आहे. ‘किसी का भी किसी की जान’ सिनेमातील ‘बिल्ली बिल्ली’ हे गाणे एक डान्सिंग सॉंग असून, लग्न पार्ट्यांमध्ये हे गाणे नक्कीच धमाका करणार हे नक्की. सध्या हे गाणे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
तत्पूर्वी ‘बिल्ली बिल्ली’ हे गाणे सलमान खानच्या ‘किसी का भी किसी की जान’ सिनेमातील दुसरे गाणे असून याआधी सिनेमातील ‘ नय्यो लगदा’ हे गाणे रिलीझ झाले होते. जे सुपरहिट ठरले. या बिल्ली बिल्ली गाण्याला सुखबीरने आपला आवाज दिला असून, गाणे आता हळूहळू गाजायला सुरुवात झाली आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अमिताभ बच्चन यांच्यासोबत गाण्याची शूटिंग केल्यानंतर ‘या’ करण्यासाठी रात्रभर रडल्या होत्या स्मिता पाटील
‘मी खरंच माफी मागतो’ देवमाणूस फेम एकनाथ गीते यांची ‘ती’ पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल