अभिनेता करण सिंग ग्रोवर (Karan singh grover) याचा फायटर हा चित्रपट नुकतेच काही दिवसांपूर्वी रिलीझ झाला आहे. त्यामुळे तो सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटात करणने आयएएफ ऑफिसर ‘स्क्वाड्रन लीडर सरताज गिल’ची भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्याच्यासोबत दीपिका पदुकोण आणि ऋतिक रोशन देखील मुख्य भूमिकेत आहेत. त्याचप्रमाणे अनिल कपूर देखील या चित्रपटात आहे. करणने नुकतेच त्याच्या एका मुलाखतीत सांगितले की त्याची पत्नी बिपाशा बसू हिला त्याच्यासोबत काम करण्याची इच्छा नाहीये.
करणने वडील झाल्यानंतर चित्रपटात काम करण्याचा अनुभव सांगितला आणि म्हणाला, “देवीच्या जन्मानंतर अवघ्या पाच दिवसांनी मला चित्रपटाच्या शूटिंगसाठी दुसऱ्या शहरात जावे लागले. बिपाशाची प्रकृतीही चांगली नव्हती. अशा परिस्थितीत या दोघीना सोडून जाणे माझ्यासाठी खूप कठीण होते, परंतु त्यावेळी मला बिपाशाची साथ मिळाली आणि या विषयावर काही चर्चा करण्यापूर्वीच बिपाशाने कामावर जा असे सांगितले.”
करणने मुलाखतीत पुढे खुलासा केला की, “बिपाशाचे सिझेरियन ऑपरेशन झाल्यामुळे तो स्वतःला जाण्यापासून थांबवत होता. करण म्हणाला, ‘तिची सिझेरियन प्रसूती झाली आणि तिला टाकेही पडले. अशा परिस्थितीत तिची साथ असणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे होते, पण बिपाशा खूप धाडसी आहे. सर्व गोष्टी त्यांनी स्वतःच सांभाळल्या होत्या. ती अशा प्रकारची व्यक्ती आहे जी प्रत्येक गोष्टीसाठी तयार असते आणि प्रत्येक गोष्टीबद्दल सर्वकाही जाणते.”
करण म्हणाला, “तिला माझ्यासोबत काम करायचे नाही. ती म्हणते मी तुला कामातही सांभाळू शकत नाही. ती म्हणते की कामाच्या ठिकाणी मला शांत राहायचे आहे आणि स्वतःवर लक्ष केंद्रित करायचे आहे. मला माझे काम स्वतः करावे लागेल. ती आपला विचार बदलणार नाही.”
करण आणि बिपाशाने 2015 मध्ये आलेल्या ‘अलोन’ चित्रपटात एकत्र काम केले होते. येथूनच त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली. यानंतर दोघांनी 2016 मध्ये लग्न केले आणि 2022 मध्ये त्यांची मुलगी देवीचे स्वागत केले, परंतु ‘अलोन’ नंतर दोघांनी पुन्हा कधीही स्क्रीन शेअर केली नाही आणि एकत्र काम करण्याबाबत करणने सांगितले की, भविष्यातही असेच घडेल.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘अचानक चेहऱ्याला मुंग्या आल्या आणि सगळं सुन्न झालं’ श्रेयश तळपदेने शेअर केला हृद्यविकाराच्या झटक्याचा अनुभव
‘श्रेयसच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी अक्षय कुमार सतत कॉल करत होता’, दीप्ती तळपदेने केला खुलासा