आपल्या प्रत्येक चित्रपटातून समाजाचे भयाण वास्तव समोर आणणाऱ्या श्याम बेनेगल यांच्या ‘या’ सिनेमाने केली ऑस्कर वारी

चित्रपट निर्माते श्याम बेनेगल (Shyam Benegal) हे चित्रपट बनवण्याच्या आणि सिनेमाच्या माध्यमातून समाजातील वास्तव प्रेक्षकांपुढे दाखवण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या चित्रपटात मोठे सुपरस्टार नसतील, पण त्यांची कथा सांगण्याची स्टाईल सर्वांची मने जिंकते. त्यांच्या चांगल्या कामासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. श्याम बेनेगल यांनी नुकताच त्यांचा ८७ वा वाढदिवस साजरा केला. श्याम यांचा जन्म १४ डिसेंबर १९३४ रोजी हैदराबादच्या त्रिमुलघेरी भागात झाला. श्याम यांना त्यांच्या चित्रपटासाठी ७ वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यासोबतच त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि दादासाहेब फाळके आदी अनेक मोठे पुरस्कार देखील

अंकुर

शबाना आझमी यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात ‘अंकुर’ सिनेमातून केली होती. या चित्रपटात जमीनदारी व्यवस्थेच्या दुष्कृत्यांवर खोलवर घाव घालण्यात आला आहे. श्याम यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबतच त्याची कथाही लिहिली आहे. या चित्रपटाचे खूप कौतुक झाले आणि अनेक पुरस्कारही मिळाले.

मंथन

श्याम यांचा ‘मंथन’ हा चित्रपट आजही खूप आवडीने पाहिला जातो. भारतातून हा सिनेमा ऑस्करसाठी पाठवण्यात आला होता. या चित्रपटात ग्रामीण भारताची कथा दाखवण्यात आली होती. या चित्रपटात नसीरुद्दीन शाह, स्मिता पाटील आणि गिरीश कर्नाड मुख्य भूमिकेत दिसले होते.

कलयुग

श्याम यांच्या ‘कलयुग’ या चित्रपटात शशी कपूर, रेखा आणि राज बब्बर मुख्य भूमिकेत दिसले होते. या सिनेमात दोन भावांची कथा दाखवण्यात आली होती. ज्यात सरकारी परवाना आणि कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी त्यांच्यात वाद होतो. या चित्रपटाला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

जुनून

श्याम बेनेगल यांचा ‘जुनून’ हा चित्रपट रस्किन बाँडच्या ‘ए फ्लाइट ऑफ पिजन’वर आधारित होता. या चित्रपटात शबाना आझमी, नसीरुद्दीन शाह, जेनिफर केंडल, नफिसा अली यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.

हेही वाचा-

पवन सिंग आणि अक्षरा सिंगने बर्फाळ मैदानात आपल्या रोमान्सने लावली आग

एका चापटीने बदलवले होते हिंदी चित्रपटसृष्टीतील राज कपूर यांचे नशीब, कमी वयातच मिळाली ‘शोमॅन’ ओळख

समुद्राच्या पाण्यात चील मारताना दिसली इलियाना डिक्रुझ, मालदीवमधील फोटो आले समोर

Latest Post