Wednesday, March 27, 2024

भारती सिंगने बेबी बंपसोबत केला स्टायलिश फोटोशूट, चेहऱ्यावर पाहायला मिळाला प्रेग्नेंसी ग्लो

कॉमेडियन भारती सिंग (Bharti Singh) ही लोकप्रिय कॉमेडियन आहे. अमृतसरमध्ये जन्मलेल्या भारतीने मेहनत आणि कौशल्याच्या जोरावर मनोरंजन क्षेत्रात विशेष स्थान निर्माण केले आहे. भारतीने तिच्या मेहनत आणि क्षमतेच्या जोरावर आयुष्यात यश मिळवले आहे. भारतीने अलिकडेच तिच्या प्रेग्नेंसीबद्दल माहिती देऊन चाहत्यांना आश्चर्यचकित केले. ती गरोदरपणाबद्दल खूप उत्साहित आहे आणि तिच्या आयुष्यातील या टप्प्याचा खूप आनंद घेत आहे.

भारती आणि हर्ष लिंबाचीया आई-वडील होणार असून, हा आनंद दोघांच्याही चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. भारती याबाबत पॅपराझींशीही बोलते आणि त्यांच्यासोबत विनोद करताना दिसते. नुकतेच भारतीने तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारतीने काही तासांपूर्वी तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर बेबी बंपचे अनेक फोटो शेअर केले आहेत. तिने बेबी बंपसोबत स्टाईलिश फोटोशूट केले आहे. या फोटोंमध्ये भारती खूपच सुंदर आणि आनंदी दिसत आहे. यामध्ये ती खूपच स्टाईलिश लूकमध्ये दिसत आहे.

भारतीच्या या फोटोंसह त्याचे कॅप्शन चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. हे कॅप्शन प्रत्येक आईसाठी आहे, ज्या प्रेग्नेंट आहे. भारती सांगते की, गर्भवती महिलांनी फक्त आनंदी आठवणींचा विचार केला पाहिजे आणि त्यांनी मजा केली पाहिजे. तिने लिहिले की, “फक्त आनंदाचा विचार करा, खूप मजा येईल.”

भारतीने या फोटोशूटसाठी हलका तपकिरी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. ज्याच्या बलून स्लीव्हज आहेत. यामध्ये ती ड्रेसमध्ये तिचा बेबी बंप फ्लॉंट करत आहे. भारतीच्या फोटोंवर तिचे चाहते हार्ट इमोजी कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत. भारतीच्या एका चाहत्याने लिहिले की, “प्रिय भारती, तुला शुभेच्छा.” तर दुसऱ्याने लिहिले की, “ब्युटी क्वीन.”

भारती सिंगने २०१७ मध्ये पटकथा लेखक-होस्ट हर्ष लिंबाचियासोबत लग्न केले. यावर्षी एप्रिलमध्ये हे जोडपे त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत करणार आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा