रोमानियाच्या ‘या’ मॉडेलच्या सौंदर्यावर भाळला होता सलमान; त्यांच्या लग्नाच्या देखील उठल्या होत्या अफवा


बॉलिवूड हे सर्वांसाठीच खुले आहे. इथे कोणीही प्रतिभासंपन्न व्यक्ती येऊन त्यांची कला जगासमोर आणू शकतात. आजही आपण इंडस्ट्रीमध्ये पाहिले, तर आपल्या लक्षात येईल की, भारताबाहेरून आलेले कलाकार इथे सुपरहिट ठरले आहे. हे फक्त आज नाही तर पूर्वीच्याकाळी देखील असे घडले आहे, की भारताबाहेरून येऊन अनेक कलाकारांनी बॉलिवूडमध्ये त्यांचे नाव कमावले. आजही अनेक कलाकार इथे येतात आणि त्यांची कला सादर करतात. अशीच एक रोमानियातून भारतात आलेली अभिनेत्री म्हणजे युलिया वंतूर. सलमानची गर्लफ्रेंड म्हणून ओळख मिळवणारी युलिया आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. जाणून घ्या तिच्याबद्दल अधिक माहिती.

युलियाचा जन्म २४ जुलै १९८०मध्ये लासी रोमानियामध्ये झाला. मूळची रोमानियन असणारी युलिया तेथील प्रसिद्ध गायिका आणि मॉडेल आहे. युलियाने रोमानियामधून कायद्याची पदवी संपादन केली. वयाच्या १५ व्या वर्षी तिने तिच्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. पुढे ती भारतात आली. भारतात आल्यावर तिची भेट सलमान खानशी झाली आणि काही काळाने त्यांच्या डेटिंगच्या अफवा यायला लागल्या. (Birthday Special Iulia Vantur information in marathi)

रिपोर्टनुसार, २०१० साली सलमान जेव्हा बॉडीगार्ड सिनेमाचे चित्रीकरण तेथे करत होता. तेव्हा सलमान खान आणि युलियाची पहिली भेट झाली. तेव्हा ती Marius Moga ला डेट करत होती. Marius हा एक संगीतकार आहे आणि सलमानने त्याला ‘तेरी मेरी’ गाण्याचे रोमानियन राइट्स द्यायला मदत केली होती. हे एक रोमानियन गाणे आहे आणि हिमेश रेशमियाने ते हिंदीत केले आहे.

सलमान खानने तिला बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचा सल्ला दिला. काही महिन्यानंतर तिचे तिच्या प्रियकराशी ब्रेकअप झाले आणि काही दिवस मुंबईत राहिल्यानंतर ती परत तिच्या देशात परतली. २०१२ मध्ये सलमान खानच्या सांगण्यावरून ती पुन्हा त्याला भेटायला आली. सलमान खानने त्याच्या पनवेल फार्महाऊसमध्ये तिच्या राहण्याची व्यवस्था केली होती. इथे तिने अनेक सिनेमांसाठी ऑडिशन दिले. त्यानंतर ती सलमान खानच्या फिल्म ‘ओ तेरी’ मध्ये आयटम साँग करताना दिसली.

सलमान आणि युलिया अनेकदा एकत्र दिसायला लागले. यानंतरच दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या. एकवेळ असा होता, जेव्हा दोघं लग्न करणार असेच सर्वाना वाटले. यावर बोलताना सलमान म्हणाला होता की, जेव्हा तो लग्न करेल तेव्हा तो लपून छपून लग्न करणार नाही. रोमानियातील एका वृत्तपत्राने युलियाबद्दल लिहिताना ‘रॉयल मिसेस खान’ असे लिहिले होते. युलियाने सलमानशी लग्न करून आता ती भारतातच स्थायिक झाली अशी चर्चा तिथे झाली होती.

गेल्या वर्षी कोरोना काळात युलिया वंतूर सलमानसोबत राहत होती. सलमान आणि युलिया त्यांच्या पनवेल फार्म हाऊसमध्ये एकत्र होते. तिथले त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. युलियाने सलमानच्या राधे सिनेमासाठी ‘सिटीमार’ गाणे देखील गायले. हे गाणे तुफान गाजले.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

कार्तिक आर्यनच्या नव्या चित्रपटाची घोषणा; आता पायलट बनून अभिनेता जिंकणार रसिकांची मनं

राज कुंद्रा प्रकरणात शिल्पा शेट्टीचा ‘हंगामा २’ झाला प्रदर्शित; चित्रपटावर होणार परिणाम?

‘आयुष्यभर तुरुंगात सड’ म्हणत राज कुंद्रावर आरोप लावणारी पुनीत कौर नक्की आहे तरी कोण? वाचा


Leave A Reply

Your email address will not be published.