Monday, July 1, 2024

HAPPY BIRTHDAY | ​​’एमएस धोनी’ चित्रपटापेक्षा वेगळी आहे ​​माहीची लव्हस्टोरी? ‘अशी’ झाली होती साक्षीसोबत पहिली भेट

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण चाहत्यांच्या मनात त्याची क्रेझ अजूनही कायम आहे. महेंद्रसिंग धोनीचे चाहते देशातच नाही तर परदेशातही आहेत. महेंद्रसिंग धोनी हा भारताचा माजी भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. ज्याने त्याच्या कर्तुवाच्या जोरावर जागतिक क्रिकेटमध्ये उच्च ओळख मिळवली आहे. 7 जूलै 2023ला तो त्याचा 42वा वाढदिवस साजरा करत आहे.

धोनी (Mahendra Singh Dhoni) वन डे, टी-20 आणि कसोटी सामन्यांमध्ये विविध पदांवर खेळला आहे. पण एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एक महान कर्णधार म्हणून त्याने सर्वाधिक प्रसिद्धी मिळवली आहे. त्याच्या जीवनावर आधारित ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट बनवण्यात आला आहे. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की चित्रपटात दाखवलेली धोनीची प्रेमकथा त्याच्या खऱ्या आयुष्यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. चलातर जाणून घेऊया त्याची स्टोरी.

महेंद्रसिंग धोनीचा (MS Dhoni) जन्म झारखंडच्या रांची येथे झाला आहे. धोनीने लहानपणी क्रिकेट खेळण्याचा विचारही केला नव्हता. त्याचे वडील पान सिंग हे मूळचे उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यातर राहत होते. ते कामासाठी रांचीला गेले होते. धोनीलाही लहानपणी फुटबॉलपटू व्हायचे होते, पण शिक्षकांच्या सल्ल्याने त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली.

धोनीच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘एमएस धोनी’ या चित्रपटात त्याची आणि साक्षीची प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ही कथा वास्तविक जीवनात पूर्णपणे वेगळी आहे. खरे तर धोनी आणि साक्षी दोघेही एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते. साक्षीचे आजोबा वनविभागात अधिकारी होते, तर धोनीचे वडील रांची येथील भारत सरकारच्या स्टील प्रोडक्शन प्लांटमध्ये काम करत होते. या नोकरीमुळे ते रांचीला स्थायिक झाले.

साक्षीचे वडीलही याच कारखान्यात काम करत होते, त्यामुळे दोघेही एकमेकांना ओळखत होते. याशिवाय धोनी आणि साक्षी दोघेही रांचीच्या डी.एव्ही श्यामली शाळेत शिकले. मात्र, नंतर साक्षीचे कुटुंब डेहराडूनला शिफ्ट झाले. साक्षीचे कुटुंब डेहराडूनला गेल्यानंतर धोनी आणि ती 2007 मध्ये कोलकात्यात भेटली होती. त्यावेळी टीम इंडिया कोलकाता येथील हॉटेल ताज बंगालमध्ये थांबली होती.

या हॉटेलमध्ये साक्षी तिची इंटर्नशिप करत होती. मात्र, त्यावेळी दोघांच्या भेटीची व्यवस्था साक्षीचे व्यवस्थापक युद्धजित दत्ता यांनी केली होती. या भेटीनंतर धोनीने युधजीत दत्ताला साक्षीचा नंबर मागितला आणि तिला मेसेजही केला. धोनीचा मेसेज पाहून साक्षी आश्चर्यचकित झाली. मार्च 2008 मध्ये दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती.

अधिक वाचा- 
ब्रेकिंग! मिथुन चक्रवर्ती यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, डोळ्यातील अश्रू थांबता थांबेना
उर्फीने सुंदर दिसण्यासाठी केले लिप फिलर्स, अभिनेत्रीच्या सुजलेल्या ओठांचे फोटो पाहून तुम्ही व्हाल थक्क

हे देखील वाचा