Thursday, March 28, 2024

अनेक गोष्टींमुळे सुपरमॉडेल असणारे मिलिंद सोमण बनले होते चर्चेचा आणि वादाचा विषय

अभिनेते मिलिंद सोमण हे त्यांच्या फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असतात. सोशल मीडियावर देखील ते मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. प्रत्येक दिवशी ते त्यांचे फोटो चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर करत असतात. मिलिंद गुरुवारी (४ नोव्हेंबर) त्यांचा ५६ वा वाढदिवस साजरा करत आहेत. चला तर जाणून घेऊया त्यांच्याबाबत काही खास गोष्टी…

मिलिंद सोमण यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९६५ मध्ये झाला आहे. त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात एक मॉडेल म्हणून केली. नंतर अनेक रियॅलिटी शोचे परीक्षण केले. (Birthday special: know some interesting facts about Milind Soman )

मिलिंद सोमण हे त्यांच्या वैयक्तिक तसेच व्यावसायिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिले किंबहुना आजही असतात. १९९५ साली त्यांनी त्यांचे न्यूड फोटोशूट केले होते. त्यामुळे ते खूपच चर्चेत आले आणि वादाच्या भोवऱ्यात देखील अडकले होते. या फोटोशूटमध्ये मिलिंद यांच्यासोबत त्यावेळीच प्रसिद्ध मॉडेल मधू सप्रे देखील दिसली होती. त्या दोघांचा एका ब्लॅक अँड व्हाईट फोटो व्हायरल होत होता.

मिलिंद यांनी केलेल्या या फोटोशूटमुळे अनेक प्रश्न उपस्थित राहिले होते. त्यांच्या विरोधात याचे प्रदर्शन केले होते. या फोटोमुळे त्यांच्यावर १४ वर्ष कारवाई चालू होती. त्या नंतर ते १९९५ साली अलिशा चिनॉय यांचा सुपरहिट अल्बम ‘मेड इन इंडिया’ मध्ये मिलिंद दिसले होते. या अल्बमनंतर त्यांची प्रसिध्दी सर्वत्र पसरली. आता देखील त्यांचे जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

मिलिंद सोमण यांनी त्यांच्या पहिल्या फोटोशूटचे फोटो शेअर केले होते. त्यासाठी त्यांना ५० हजार रुपये मिळाले होते. त्यांनी ते फोटो शेअर करून लिहिले होते की, “१९८९ मधील पहिली जाहिरात. मला काही तासांच्या फोटोशूटसाठी ५० हजार रुपये मिळाले होते, मी हैराण झालो होतो. त्यावेळी मी २३ वर्षाचा होतो.”

मिलिंद यांनी २०१८ साली त्यांच्यापेक्षा २५ वर्षांनी लहान असणाऱ्या मुलीशी अंकिताशी लग्न केले आहे. यानंतर ते पुन्हा खूपच चर्चेत आले होते. त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यांच्याकडे पाहूनच त्यांच्या वयातील अंतर अजिबात समजून येते. अंकिता मिलिंद यांच्यापेक्षा खूपच लहान दिसते. काही दिवसांपूर्वी मिलिंद यांची एक चाहती त्यांच्याकडे सेल्फी घेण्यासाठी आली होती तेव्हा त्यांनी तिला सेल्फी देण्यासाठी रस्त्यावर पुशअप्स मारायला सांगितले होते. त्यावेळी देखील ते खूप चर्चेत आले होते.

मिलिंद यांचा फिटनेस पाहून आजही प्रत्येक जणं त्यांच्या प्रेमात पडेल असा आहे. ते रोज अनेक किलोमीटर धावतात. त्यांनी त्यांच्या शरीराला व्यायामाची कडक शिस्त लावली आहे. मिलिंद हे एक सुपर मॉडेल असण्यासोबतच त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

तब्बूला पाहून जेव्हा ‘या’ अभिनेत्याचा सुटला स्वतःवरचा ताबा, आजही तिच्या आठवणीत आहे ‘तो’ किस्सा

तर ‘अशा’ पद्धतीने घातली विकी कौशलने कॅटरिना कैफला लग्नाची मागणी

लग्नानंतर साजऱ्या होणाऱ्या पहिल्या दिवाळीसाठी सोनाली कुलकर्णीने केली खास तयारी शेअर केला व्हिडिओ

हे देखील वाचा