Wednesday, June 3, 2026
Home बॉलीवूड आनंदाची बातमी! प्रसिद्ध अभिनेता चौथ्यांदा बनणार बापमाणूस, पत्नीने रेड कार्पेटवर केला बेबी बंप फ्लॉन्ट

आनंदाची बातमी! प्रसिद्ध अभिनेता चौथ्यांदा बनणार बापमाणूस, पत्नीने रेड कार्पेटवर केला बेबी बंप फ्लॉन्ट

हॉलिवूडमधून आनंदाची बातमी समोर येत आहे. पावर कपल म्हणून ओळखले जाणारे रायन रेनॉल्ड्स आणि ब्लेक लाईव्हली आपल्या चौथ्या बाळाच्या स्वागताची तयार करत आहेत. नुकत्याच झालेल्या एका इव्हेंटमध्ये ब्लेकने तिचे बेबी बंप फ्लॉन्ट केले. 10व्या फोर्ब्स पावर महिला शिखर सम्मेलनाच्या रेड कार्पेटवर अभिनेत्री गोल्डन स्कीनिंग ड्रेस परिधान करून पोहोचली होती. यावेळी तिने आत्मविश्वासाने आपला बेबी बंप फ्लॉन्ट केला होता. हे जोडपे तीन मुलींचे आई-वडील आहे. त्यांच्या तिन्ही मुलींची नावे जेम्स रेनॉल्ड्स, बेट्टी रेनॉल्ड्स आणि इनेज रेनॉल्ड्स असे आहे.

यापूर्वी मागील महिन्यात ‘गॉसिप गर्ल’ फेम अभिनेत्री ब्लेक लाईव्हली हिने पांढऱ्या रंगाच्या बिकिनीतील फोटो शेअर केला होता, ते पाहून अंदाज लावणे कठीण होते की, ब्लेक एका मुलाला जन्म देणार आहे. आपल्या 35व्या वाढदिवसापूर्वी तिने इंस्टाग्रामवर एक पांढऱ्या रंगाच्या बिकिनीत आपला एक शानदार फोटो शेअर केला होता. यामध्ये तिने तिचे टोन्ड ऍब्स फ्लॉन्ट केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Blake Lively (@blakelively)

रायन रेनॉल्ड्स (Ryan Reynolds) आणि ब्लेक लाईव्हली (Blake Lively) यांनी 2012मध्ये लग्न केले होते. हे दोघेही त्यांच्या मुलींना लाईमलाईटपासून दूर ठेवत आहेत. रायन आणि ब्लेक हे त्यांचे वैवाहिक आयुष्य खूप चांगल्याप्रकारे जगत आहेत. ब्लेक मे महिन्यात फोर्ब्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, “मुले असल्याने मला अधिक आत्मविश्वास जाणवला. यापूर्वी मला कधीही माझ्या शरीरावर अधिक आरामदायी किंवा अधिक आत्मविश्वास वाटला नाही.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Vanguardia (@vanguardiaweb)

सन 2014मध्ये दिला मुलीला जन्म
ब्लेक लाईव्हली हिने पुढे बोलताना म्हटले की, “असे नाही की, दिवसभरात मला एक लाखवेळा असुरक्षिततेची भावना येते, परंतु मला अविश्वसनीयरीत्या स्वत:ला व्यवस्थित आणि स्थापित असल्याचे जाणवते.” रायन आणि ब्लेक यांची मोठी मुलगी जेम्सचा जन्म 2014मध्ये झाला होता. 2016मध्ये दोघांनीही त्यांची दुसरी मुलगी इनेज हिचे स्वागत केले होते. त्यानंतर त्यांनी 2019मध्ये बेट्टी हिला जन्म दिला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Blake Lively (@blakelively)

ब्लेकने बालकलाकार म्हणून सुरू केली होती कारकीर्द
ब्लेक लाईव्हलीने बालकलाकार म्हणून 2005मध्ये ‘द सिस्टरहूड ऑफ द ट्रॅव्हेलिंग पँट्स’सोबत आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली होती. तिला ‘गॉसिप गर्ल’मध्ये साकारलेल्या भूमिकेतून प्रसिद्धी मिळाली. ती रायनसोबत 2011मध्ये पहिल्यांदा ‘ग्रीन लँटर्न’ सिनेमात दिसली होती. ती शेवटची 2020मध्ये आलेल्या ‘द रिदम सेक्शन’ सिनेमात झळकली होती.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ऍडमिट होऊन 35 दिवस उलटले, तरीही राजू बेशुद्धच! भाऊ म्हणाला, ‘आता फक्त…’
‘ढाई किलो’चा हात दाखवत सनीने लावला निर्मात्याला चुना, 20 वर्षांनंतर अभिनेत्याविरुद्ध फसवणुकीचा आरोप
‘मला माहित आहे त्याचा खून झालाय’, सुशांत सिंग राजपूत मृत्यूवर फैसल खानचे मोठे वक्तव्य

हे देखील वाचा