‘आम्ही बॉबी देओलला शोधतोय’, ‘आश्रम ३’ च्या सेटवर बजरंग दलाचा राडा; दिग्दर्शकाच्या चेहऱ्यावर फेकली शाई


अभिनेता बॉबी देओलच्या ‘आश्रम’ या वेबसीरिजच्या दोन्ही सीझनला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला होता. अशातच प्रकाश झा यांनी या सीरिजच्या तिसऱ्या सिझनची तयारी सुरू केली आहे. भोपळमध्ये ‘आश्रम ३’ ची शूटिंग चालू झाली आहे. ही वेबसीरिज आधीपासूनच खूप चर्चेत आहे. अशातच या चर्चांना आणखी वेग आला आहे.

भोपाळमध्ये बजरंग दलाच्या काही लोकांनी ‘आश्रम ३’ च्या सेटवर तोडफोड केली. माध्यमांतील वृत्तांनुसार, तेथील लोकांनी दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या चेहऱ्यावर शाही देखील फेकली. त्यांचे असे म्हणणे आहे की, या वेबसीरिजचे नाव बदलले पाहिजे. नाहीतर ते मध्यप्रदेशमध्ये ही शूटिंग होऊन देणार नाहीत. (Bobby Deol ashram 3 seta in bhopal vandalished by bajrang dal people)

बजरंग दल प्रमुख सुशीलने सांगितले की, “मध्यप्रदेशमध्ये फिल्म सिटीला प्रमोट केले पाहिजे. लोकांना काम मिळाले पाहिजे. मात्र, या जमिनीचा वापर हिंदू समाजाला अपमानित करण्यासाठी झाला नाही पाहिजे. या सीरिजच्या आधीच्या भागांमध्ये असे दाखवले होते की, आश्रममध्ये महिलांचे शोषण होत आहे. मात्र, खरंच असं आहे का? हिंदूंना फसवणे बंद करा आणि जर त्यांना प्रसिद्धी हवी असेल, तर इतर कोणत्या तरी धर्माचे नाव का घेत नाही?”

बजरंग दलाचे लोक सेटवर ‘प्रकाश झा मुर्दाबाद’, ‘बॉबी देओल मुर्दाबाद’ आणि ‘जय श्री राम’ अशा घोषणा देत होते. त्यांनी सांगितले की, “आम्ही बॉबी देओलला शोधत आहेत, जो या सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत आहे. त्याला त्याचा भाऊ सनी देओलकडून काहीतरी शिकले पाहिजे.”

बजरंगी दलाच्या लोकांनी क्रूवर दगड फेकले. त्यामुळे क्रू मेंबर्सला देखील शारीरिक दुखापती झाल्या. पोलिसांचे असे म्हणणे आहे की, कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही, परंतु ते यावर नक्कीच काहीतरी ऍक्शन घेतील.

यावर दिग्दर्शक हंसल मेहता यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटलं की, “मला अगदी २१ वर्षांपूर्वीचा तो प्रसंग आठवला, जेव्हा एका नवीन दिग्दर्शकाच्या चेहऱ्यावर मुंबईतील काही शिवसेनेच्या माणसांनी काळ्या शाईने गंध लावला होता. मग आम्ही गप्प बसलो आणि त्या मौनाचा परिणाम अशी चित्रे आहेत… दोष जितका गुंडांचा तितकाच आपला आहे…”

या सर्व प्रकरणावर सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगलीय.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘हा तर तोंडावरूनच गुंड वाटतो’, म्हणत पूनम सिन्हा यांच्या आईने नाकारले होते शत्रुघ्न यांचे स्थळ

-जॉन अब्राहमच्या ‘सत्यमेव जयते २’ चित्रपटाचे पोस्टर रिलीझ, प्रदर्शनाची तारीखही जाहीर

-‘जोपर्यंत हे मला लहान मुलासोबत बघणार नाही…’ प्रेग्नंसीच्या अफवांवर बिपाशा बासूचे नेटकऱ्यांना सणसणीत उत्तर


Leave A Reply

Your email address will not be published.