Saturday, March 2, 2024

Bobby Deol Bday Special : डिप्रेशनचा शिकार झाला होता बॉबी देओल, सल्लू भाईने केली होती अशाप्रकारे मदत

हिंदी सिनेसृष्टीत असे अनेक अभिनेते आहेत ज्यांना चित्रपटक्षेत्रात आपल्या अभिनयाची जादू दाखवता आली नाही. अनेक चांगल्या चित्रपटात भूमिका साकारूनही त्यांना आपला प्रभाव पाडता आला नाही. यापैकीच एक नाव म्हणजे अभिनेता बॉबी देओल. घरात अभिनयाचा वारसा असूनही बॉबी देओलला चित्रपटात यश आले नाही, कालांतराने तो या क्षेत्रापासून दूर गेला.

अभिनेता बॉबी देओलचे (bobby deol) सिनेसृष्टीतील करिअर खूपच असमाधानी ठरले आहे. आपल्या करिअरच्या सुरुवातीला त्याने ‘बरसात’, ‘बादल’, ‘बिच्छू’सह अनेक चित्रपट केले मात्र या चित्रपटांना यश मिळू शकले नाही, सुपरस्टार धर्मेंद्रचे चिरंजीव असलेल्या बॉबीने सुरुवातीला आपल्या लुक्समूळे आणि स्माइलमूळे खूप प्रसिद्धी मिळवली. मात्र त्याला चित्रपटक्षेत्रात नेहमीच अपयशाचा सामना करावा लागला,ज्यामुळे त्याने या क्षेत्रापासुन हळुहळु दुर जायला सुरुवात केली. त्याच्या ‘पोस्टर बॉइज’ चित्रपटाने पुन्हा एकदा त्याला आशेचा किरण दिसला होता, मात्र त्याला चांगल्या चित्रपटांची ऑफरच येणे बंद झाले. ज्यामुळे त्याला चित्रपटापासुन दूर जावे लागले.

Bobby Deol, son of Dharmendra opens up on nepotism - OrissaPOST

मात्र आपल्या सततच्या फ्पॉप चित्रपटांनी बॉबी देओल पूर्ण डिप्रेशनमध्ये गेल्याच्याही बातम्या समोर आल्या होत्या. बॉबीचा मोठा भाऊ सनी देओलनेही त्याला या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न केला. शेवटी अभिनेता सलमान खानने बॉबीला मदत करत ‘रेस ३’ चित्रपटात काम करण्याची संधी दिली. ज्यामुळे बॉबीला पुन्हा एकदा नवी ओळख मिळाली. ‘रेस ३’ च्या वेळी एका मुलाखतीत बोलताना बॉबीने याबद्दल खुलासा करताना सांगितले की, ”माझी आणि सलमान खानची भेट एका वर्षापुर्वी झाली होती, यावेळी सलमानने मला धीर देताना प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार येत असतात. माझ्या वाईट काळात मला संजय दत्त आणि तुझ्या भावांनी मदत केल्याचे सांगितले.” त्यानंतर सलमान खानने बॉबीला ‘रेस ३’ चित्रपटासाठी संधी दिली.

I want the new generation to know that there's an actor called Bobby Deol | Hindi Movie News - Times of India

 

याबद्दल पुढे बोलताना बॉबीने सांगितले की, ”सलमान खानने माझ्यातली धडपड पाहिली, माझी काम करण्याची तळमळ पाहिली. म्हणूनच त्याने मला या चित्रपटाची ऑफर दिली.” ‘रेस ३’ चित्रपटातील बॉबीच्या कामाचे सर्वत्र कौतुक झालं. त्यानंतर त्याने अक्षय कुमारच्या ‘हाऊसफुल ४’ मध्येही काम केले. मात्र त्याच्या ‘आश्रम’ वेबसिरीजने पुन्हा एकदा लोकप्रियता मिळवून दिली.

We're Obsessed With This Twitter Account Which Is Obsessed With Bobby Deol | Buzz

बॉबी पुन्हा एकदा चित्रपट क्षेत्रात आपला जम बसवत असून लोकांनी पुन्हा एकदा त्याला पसंती दर्शवली आहे. यासाठी बॉबीनेही जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याच्याकडे सध्या अनेक चांगले चांगले प्रोजेक्ट असल्याचे बोलले जात आहे. हळूहळू दूर जायला सुरुवात केली. त्याच्या ‘पोस्टर बॉइज’ चित्रपटाने पुन्हा एकदा त्याला आशेचा किरण दिसला होता, मात्र त्याला चांगल्या चित्रपटांची ऑफरच येणे बंद झाले. ज्यामुळे त्याला चित्रपटापासुन दूर जावे लागले.

याबद्दल पुढे बोलताना बॉबीने सांगितले की, ”सलमान खानने माझ्यातली धडपड पाहिली, माझी काम करण्याची तळमळ पाहिली. म्हणूनच त्याने मला या चित्रपटाची ऑफर दिली.” ‘रेस ३’ चित्रपटातील बॉबीच्या कामाचे सर्वत्र कौतुक झालं. त्यानंतर त्याने अक्षय कुमारच्या ‘हाऊसफुल ४’ मध्येही काम केले. मात्र त्याच्या ‘आश्रम’ वेबसिरीजने पुन्हा एकदा लोकप्रियता मिळवून दिली. बॉबी पुन्हा एकदा चित्रपट क्षेत्रात आपला जम बसवत असून लोकांनी पुन्हा एकदा त्याला पसंती दर्शवली आहे. यासाठी बॉबीनेही जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याच्याकडे सध्या अनेक चांगले चांगले प्रोजेक्ट असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा