×

‘बिग बॉस १५’मध्ये सहभागी होणं देवोलिनाला पडलं भलतंच महागात! लवकरच करावी लागणार गंभीर शस्त्रक्रिया

रियॅलिटी शो ‘बिग बॉस १५’ आता शेवटच्या टप्प्यावर आला आहे. लवकरच या शोच्या विजेत्याचे नाव प्रेक्षकांसमोर येईल. फिनालेपूर्वी देवोलिना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) आणि अभिजीत बिचकुले (Abhijeet Bichukle) यांना घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. घरातून बाहेर पडल्यानंतर देवोलीनाने असा एक खुलासा केला, ज्यामुळे तिचे चाहते चिंतेत पडले आहेत.

टास्क करताना झाली जखमी
देवोलिना भट्टाचार्जीने नुकतेच इंस्टाग्रामवर लाइव्ह सेशन केले. ज्यामध्ये तिने उघड केले की, शोमधील एका टास्क दरम्यान ती खूप जखमी झाली आहे. पण, आता तिची दुखापत इतकी वाढली आहे की, तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. देवोलीनाने यावेळी ‘बिग बॉस १५’शी संबंधित तिचे अनुभवही शेअर केले. तिने सांगितले की, पोल टास्क करत असताना ती गंभीर जखमी झाली आणि तिच्या एका मज्जातंतूला इजा झाली. हे चाहत्यांना सांगताना देवोलिना भावूक झालेली पाहायला मिळाली. (bigg boss fame devoleena bhattacharjee is going to under surgery)

करावी लागणार सर्जरी
यावेळी देवोलिना भट्टाचार्जी म्हणाली, “आज माझा एमआरआय झाला आहे. माझी प्रकृती खूप गंभीर आहे. १९ तास खूप जड होते. पडल्यामुळे जास्त दुखापत झाली. मला गुरुवारी (२७ जानेवारी) रुग्णालयात दाखल करण्यात येणार असून शुक्रवारी (२८ जानेवारी) माझे ऑपरेशन होणार आहे. मी या गोष्टीशी लढा देईन. मात्र याबाबत चिंताही आहे. मला फक्त तुमच्या प्रार्थनांची गरज आहे. हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वी मला तुमच्याशी बोलायचे होते.”

View this post on Instagram

A post shared by Devoleena Bhattacharjee (@devoleena)

ती म्हणाली की ही एक मज्जातंतू डीकंप्रेशन शस्त्रक्रिया आहे, जी अत्यंत गंभीर आहे. ती म्हणाली, “वेळ खराब चालू आहे. पण यातही माझ्यासोबत काहीतरी चांगलं घडेल.” देवोलिना भट्टाचार्जीकडून हे ऐकून तिच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. देवोलिना लवकर बरी होण्यासाठी सर्वजण शुभेच्छा देत आहेत. अभिनेत्रीचे हे लाईव्ह सेशन मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही वाचा :

Latest Post