×

सिमेंटच्या पाईपमध्ये झोपून अजित खान यांनी काढल्या अनेक रात्री, पुढे खलनायक बनून गाजवली सिनेसृष्टी

सिनेमा जगतात प्रत्येक अभिनेता आपलं नशीब आजमावायला येतो. तसेच अजित खान सिनेमा जगतात हिरो बनण्यासाठी म्हणून आले. त्यांना स्वतःला कधीच खलनायकाच्या भूमिका करायच्या नव्हत्या. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी अभिनेता म्हणून हिरोच्या भूमिका काही सिनेमांमध्ये साकारल्या. परंतु त्यांना म्हणावं तशी प्रसिद्धी मिळाली नाही. खलनायक म्हणून त्यांनी सिनेमामध्ये भूमिका साकारल्या, तेव्हा त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली आणि स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण झाले. त्यांच्या भूमिका अजूनही लोकांच्या लक्षात आहेत. असंच खलनायकाच्या भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणाऱ्या अजित खान यांची गुरुवारी (२७ जानेवारी) रोजी जयंती आहे. या निमित्त जाणून त्यांचा जीवनप्रवास…

अजित खान (Ajit khan) यांचा जन्म २७ जानेवारी १९२२ रोजी हैदराबादमध्ये झाला. त्यांचं खरं नाव हामीद अली खान आहे. सिनेमा जगतात येण्यासाठी त्यांनी स्वतःचे नाव अजित खान असे केले. आपल्या अभिनय कौशल्यासाठी आणि संवाद कलेसाठी ते नेहमीच प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. कमीत कमी दोनशे सिनेमामध्ये काम केलेले अजित खान ओळखले गेले ‘कालिचरण’ या सिनेमामुळे. या सिनेमातील  ‘सारा शहर मुझे लायन के नाम से जानता है!’ हा संवाद खूप प्रसिद्ध झाला. या संवाद फेकीमुळे त्यांची स्वतःची ओळख निर्माण केली. या अभिनेत्याचा जीवन प्रवासही फार खडतर आहे. लहान असल्यापासूनच त्यांना अभिनयाची खूप आवड होती. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी त्यांची पुस्तके देखील विकली होती. पुढे अभिनयात पदार्पण करण्यासाठी ते घरातून पळून मुंबईला गेले. (actor ajit khan’s birth anniversary lets know about his life)

Remembering Ajit Khan — Mona darling & Robert's boss, and Bollywood's  much-loved don

आपल्या घरून पळून आलेल्या या माणसाने मुंबईमध्ये नशीब आजमावले नसतं, तर कदाचित एवढा चांगला अभिनेता आपल्याला पाहायला मिळाला नसता. अजित खान आपल्या उत्तम संवादफेकिमुळे ओळखले जातात. ‘लिली डोन्ट बी सिली’ आणि ‘मोना डार्लिंग’ हे दोन संवाद त्यांचे खूप गाजले. लहानपणापासूनच यांना अभिनयाची फार आवड होती.

Prominent Hindi film actor Ajit Khan - 2 Day History

घर सोडल्यानंतर मुंबईत राहण्यासाठी जागा नव्हती, म्हणून त्यांनी सिमेंटच्या पाइपमध्ये दिवस काढले. रात्र घालवण्यासाठी त्यांना तिथे राहावं लागायचं. परंतु प्रश्न तिथे सुटत नव्हता तिथे राहण्यासाठी त्यांना गुंडांना हप्ता द्यायला लागायचा. अनेकवेळा त्यांनी त्यांचा मार खाल्ला, परंतु एकदा त्यांनी त्या गोष्टीचा विरोध केला आणि तिथल्या वस्तीतले ते हिरो बनले. ‘नया दौरा’, ‘नास्तिक’, ‘कालीचरण’ हे सिनेमा सुपरहिट ठरले. २२ ऑक्टोबर १९९८ ला त्यांनी शेवटचा श्वास घेतला.  परंतु अजित खान अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.

हेही वाचा :

Latest Post