Thursday, June 13, 2024

राडाच ना भाऊ! अभिनेत्री श्वेता तिवारीने शेअर केला हॉट फोटो, ऍब्ज पाहून चाहतेही झाले घायाळ

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी नेहमीच आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजाने चाहत्यांना आकर्षित करत असते. नुकतेच तिचे काही ताजे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत, ज्यामध्ये तिचा किलर लूक पाहून चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवत आहे. श्वेता सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या फोटोवर चाहते लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

‘कसौटी जिंदगी की’ या टीव्ही मालिकेतून चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या श्वेताला वेगळ्या ओळखीची गरज नाही. छोट्या पडद्याच्या दिग्गज अभिनेत्रींबद्दल बोलायचं झालं तर श्वेताचाही (Shweta Tiwari) त्या यादीत समावेश नक्कीच होईल. आपल्या अप्रतिम अभिनय कौशल्याने श्वेताने टीव्ही इंडस्ट्रीत स्वत:चे खास नाव निर्माण केले आहे. दरम्यान, श्वेताने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर नवीन फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये श्वेता स्टायलिश रेड कलरच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. श्वेताचे हे ताजे फोटो चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनले आहेत आणि आता तिचे हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. श्वेताने तिच्या हॉट फोटोने खळबळ माजवण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही श्वेताने हा पराक्रम केला आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari)

 टीव्ही सीरियल्सशिवाय श्वेता अनेक रिअॅलिटी शोमध्येही दिसली आहे. 2006 मध्ये, श्वेता सुपरस्टार सलमान खानच्या लोकप्रिय शो बिग बॉस सीझन 4 चा भाग बनली. या हंगामात श्वेताने आपल्या शानदार खेळाने सर्वांना प्रभावित केले. श्वेता बिग बॉस 4 चे विजेतेपद जिंकण्यात यशस्वी ठरली. श्वेता सध्या स्टार प्लसवरील “मैं हू अपराजिता” या मालिकेत झळकत आहे. या मालिकेत ती एक मजबूत आणि आत्मविश्वाससंपन्न महिलाची भूमिका साकारत आहे. (Bold photo of famous actress Shweta Tiwari goes viral)

आधिक वाचा-
कॉलेजमध्ये असतानाच झाली होती दोघांची पहिली भेट, ‘अशी’ आहे स्पृहा जोशीची फिल्मी लव्हस्टोरी
दु:खद! सलमान खान आणि ऐश्वर्या सारख्या कलाकारांसोबत काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रीचे निधन

हे देखील वाचा