Wednesday, July 3, 2024

आयराच्या एंगेजमेंटमध्ये का होते कमी लाेक सहभागी? समाेर आले कारण

बॉलीवूड अभिनेता आमिर खान याची मुलगी आयरा खान हिने 18 नोव्हेंबर रोजी तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेशी एंगेजमेंट केली, ज्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. आयराच्या एंगेजमेंटचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच ट्रेंड करत आहेत. या दरम्यान, आयराने तिच्या एंगेजमेंटचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करून, एंगेजमेंटमध्ये कमी लोकांच्या सहभागाचा खुलासा केला आणि पाहुण्यांचे आभार मानले.

आयरा खान (ira khan) आणि नुपूर शिखरे (nupur shikhare) 2020 पासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र, दोघांनी त्यांचे नाते 2021 मध्ये अधिकृत केले होते. हे जोडपे अनेकदा एकमेकांसोबत पार्टी करताना आणि बॉलिवूड इव्हेंट्समध्ये एकत्र सहभागी होताना दिसतात. आता या जोडप्याच्या एंगेजमेंटनंतर लोक त्यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत.

आयरा खानने शेअर केला व्हिडिओ 
आयरा खानने तिचा हाेणारा नवरा नुपूरसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो त्यांच्या एंगेजमेंटच्या दिवसाचा आहे. हा व्हिडीओ शेअर करताना आयराने कॅप्शनमध्ये लिहिले की, “अनेक प्रसंगी मला अनेकांनी सांगितले आहे की, मी चांगल्या पार्ट्या देते. मला वाटते की, ते मला खूप श्रेय देतात. माझ्या पार्टी आणि इतरांच्या पार्टीमध्ये मोठा फरक म्हणजे पाहुण्यांची यादी. आपल्या आयुष्यातील लोकच काही क्षण आनंदी आणि मजेदार बनवतात.” एंगेजमेंटला उपस्थित राहिल्याबद्दल आयराने तिच्या खास पाहुण्यांचे आभार मानले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

आमिर खानची एक्स पत्नी किरण राव आणि रीना दत्ता या दोघीही आयराच्या एंगेजमेंट पार्टीत सहभागी झाल्या होत्या. याशिवाय आमिर खानचा भाचा अभिनेता इम्रान खान, फातिमा सना शेख आणि आशुतोष गोवारीकर यांसारखे अनेक स्टार्स आयराच्या एंगेजमेंट पार्टीत सामील झाले होते. या सर्वांनी मिळून आयराची एंगेजमेंट पार्टी एक्स्ट्रा स्पेशल बनवली. (bollywood actor aamir khan daughter ira khan revealed why were few people came in her engagement party)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कुशल टंडनने सुंबुलच्या वडिलांवर केली टीका; म्हणाला, ‘टीना देखील कोणाची तरी लेक’

अर्रर्र! असे काय घडलं की, सुंबुल तौकीर खान वडिलांसमोर रडली ढसाढसा?

हे देखील वाचा