काजोल आणि अजय देवगण यांची लेक न्यासा देवगण जेव्हाही मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद होते, तेव्हा अनेकदा ती चर्चेत असते. न्यासा रविवारी (दि. 25 नाेव्हेंबर)ला तिच्या मित्रांसोबत ख्रिसमस साजरा करण्यासाठी आली होती. मुंबईच्या एका रेस्टॉरंटमध्ये झालेल्या या ख्रिसमस पार्टीमध्ये न्यासा व्यतिरिक्त इब्राहिम अली खान, खुशी कपूर आणि वेदांत महाजन हे देखील उपस्थित होते. मात्र, लोकांचे लक्ष न्यासाच्या गुलाबी ड्रेसकडे वेधले गेले, ज्यामध्ये न्यासा खूपच सुंदर दिसत होती, परंतु या डीप नेक ड्रेसवर अनेक युजर्स न्यासाला सोशल मीडियावर ट्रोल देखील करत आहेत.
19 वर्षीय न्यासा देवगन (nysa devgn) यूकेच्या कॉलेजमध्ये शिकत आहे. अशातच न्यासा मुंबईत फक्त ख्रिसमससाठी आली होती. या पार्टीत बोनी कपूर यांची मुलगी खुशी कपूर, इब्राहिम यांच्यासह अनेक स्टार किड्स उपस्थित हाेते. न्यासाने सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानसोबत पार्टीत प्रवेश केला. इब्राहिम, न्यासा, खुशी कपूर हे सगळे खूप जवळचे मित्र आहेत.
या व्हिडिओमध्ये न्यासा औरीसोबत पार्टीमधून बाहेर पडत आहे, पण मीडियाचे कॅमेरे पाहून ती अचानक मागे वळते. अशात ऑरी तिला तिच्या गाडी पर्यंत पाेहचवून देताे. व्हिडिओमध्ये न्यासा कॅमेऱ्यांमुळे खूपच घाबरलेली दिसत आहे आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
View this post on Instagram
आता अनेक लोक न्यासाच्या या व्हिडिओवर तिच्या ड्रेसिंग सेन्सबद्दल कमेंट करत आहेत. एका युजरने लिहिले की, “माय-बापानं खूप सूट दिली आहे असे दिसते.” तर दुसर्या युजरने लिहिले, “आजकाल मुली कोणत्या प्रकारचे कपडे घालतात हे पाहून खूप वाईट वाटते.” दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “ती विजय साळगावकरांची मुलगी आहे न?”
खरं तर, न्यासा देवगन अनेकदा तिच्या कपड्यांवरून ट्रोलिंगची शिकार झाली आहे. अलीकडेच, तिच्या ‘सलाम वेंकी’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान, काजोल सोशल मीडियावर ट्रोल झाल्याबद्दल बोलली. काजोल म्हणाली, “जर तुम्हाला ट्रोल केले जात असेल, तर याचा अर्थ लोक तुमच्याकडे लक्ष देत आहेत. तुम्ही ट्रोल होत असाल, तर याचा अर्थ तुम्ही प्रसिद्ध होत आहात.” असे मत काजाेलनं मांडले.
न्यासा विषयी बाेलायचे झाले, तर ती लवकरच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. (bollywood actor ajay devgn daughter nysa spotted in busty skintight dress for christmas party photos go viral)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बिग बॉसचे धक्कादायक नॉमिनेशन, एक-दोन नव्हे तर 8 स्पर्धकांना घरातून काढणार बाहेर?
लेकीचा मृत्यूनंतर तुनिषाच्या आईने व्यक्त केला संताप म्हणाली,’त्याने 3-4 महिने माझ्या मुलीला…’










