Monday, June 24, 2024

अक्षय कुमारने चित्रपटाची फी कमी केली?? पसरलेल्या या बातम्यांना अभिनेत्याने ‘अशाप्रकारे’ दिले सडेतोड उत्तर

बॉलिवूडमधील मिस्टर खिलाडी म्हणजे अक्षय कुमार. तो दरवर्षी एका पेक्षा एक सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांसमोर घेऊन येत असतो. त्याने आजपर्यंत अनेक प्रकारचे चित्रपट देऊन प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्याचा ‘बेल बॉटम’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय कुमारच्या या चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाली आहे. यातच अक्षय कुमारच्या फी बाबत एक बातमी समोर आली आहे. ज्याचे उत्तर स्वतः अक्षय कुमारने दिले आहे.

खरंतर अक्षय कुमार त्याच्याबाबत सोशल मीडियावर पसरलेल्या कोणत्याच बातमीला उत्तर देत नसतो. परंतु आता त्यानें ‘बेल बॉटम’ या चित्रपटाच्या फीबाबत पसरत असलेल्या बातमीला चांगलेच उत्तर दिले आहे. (Bollywood actor Akshay Kumar says that news related his fee is fake)

अक्षय कुमारने आज म्हणजेच सोमवारी ट्विटरवर त्या बातमीचे उत्तर दिले, ज्यामध्ये असा दावा केला होता की, अक्षय कुमारने त्याची फी कमी केली आहे. बॉलिवूड हंगामाच्या एका बातमीनुसार असे सांगण्यात आले की, अक्षय कुमारने ‘बेल बॉटम’ या चित्रपटासाठी त्याची फी ३० कोटीने कमी केली आहे. तर आता त्याने अशा बातम्यांना फेटाळले आहे.

अक्षय कुमारने त्याच्या ट्वीटमध्ये या फीबद्दल कोणतीच माहिती दिली नाही. त्याने या बातमीला खोटे असे सांगितले आहे. या ट्वीटला रिट्विट करून त्याने लिहिले की, “या फेक स्कुप्ससाठी जागणे कसे वाटते.” यामध्ये त्याचा राग स्पष्ट दिसत आहे. त्याने ही बातमी खोटी असल्याचे सांगितले.

नुकतेच बॉलिवूड हंगामाच्या बातमीनुसार, निर्माता वाशु भगनानी यांनी अक्षय कुमारला त्याची फी कमी करण्यासाठी विनंती केली होती. यासाठी अक्षयने होकार देखील दर्शवला होता. रिपोर्टने हा दावा केला होता की, अक्षयने या चित्रपटसाठी ११७ कोटी रुपयाचे अग्रिम वेतन दिले होते. त्यांनतर त्याने त्याच्या स्लेटसाठी तीच रक्कम वाढवून १३५ कोटी केली होती.

अशातच निर्माता वाशु भगनानी चित्रपटाच्या बजेटला नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत होते. यासाठी त्यांनी अक्षय कुमारला विनंती केली की, त्याने याच्या अभिनयाची फी ३० कोटीने कमी करावी. कारण चित्रपटाचे बजेट खूपच वाढत होते. परंतु आता अक्षयने या बातमीला चुकीचे सिद्ध केले आहे. तसेच अक्षय कुमार हा बॉलिवूड मधील एक महागडा अभिनेता आहे. तो त्याच्या चित्रपटासाठी इतर अभिनेत्यांच्या तुलनेने खूप फी घेत असतो.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-लॉकडाऊननंतर ‘बिग बी’ प्रथमच निघाले शूटिंगवर; फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

-‘तू ऐलराधा, तू पैल संध्या!’ पाहा निसर्गाच्या सानिध्यात हरवलेल्या मृण्मयी देशपांडेची नैसर्गिक सुंदरता

-‘आयुष्यात विस्कटलेल्या गोष्टी गुंडाळता येत नसतील, तर…’, सुंदर फोटोवर ‘स्वीटू’ने लिहिलं लक्षवेधी कॅप्शन

हे देखील वाचा