Tuesday, May 21, 2024

खळबळजनक! महानायकांच्या घराचा सुरक्षा घेरा तोडून घुसला अज्ञात व्यक्ती, पुढं…

मेगास्टार अमिताभ बच्चन यांचे फॅन फॉलोइंग सर्व वयोगटातील लोकांमध्ये पाहायला मिळते. त्याचे चित्रपट सर्व वयोगटातील लोकांना तसेच लहान मुलांनाही आवडतात. अमिताभ यांनी खास मुलांसाठी बनवलेल्या ‘भूतनाथ‘ सारख्या काही चित्रपटातही काम केले आहे. पण अमिताभला भेटण्यासाठी एक मुलगा सर्व सिक्योरिटी ताेडेल, अशी तुम्ही कधी कल्पना करू शकता का? होय, अमिताभ बच्चन यांच्यासोबत हे खरोखरच घडले आहे आणि त्यांनी ही गोष्ट त्यांच्या एका ब्लॉगमध्ये सांगितली आहे.

खरं तर, अमिताभ बच्चन ( Amitabh Bachchan) दर रविवारी (दि. 20 नाेव्हेंबर) त्यांच्या बंगल्याबाहेर चाहत्यांना भेटतात आणि अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी बरेच लोक येथे येतात. पण आता अमिताभ बच्चन यांनी एक किस्सा सांगितला आहे, ज्यामध्ये एक चार वर्षांचा मुलगा अमिताभची सिक्योरिटी तोडतो आणि पळून जाऊन त्यांच्या पायाला स्पर्श करतो. या घटनेचा संदर्भ देत अमिताभ बच्चन यांनी लिहिले, “हा 4 वर्षाचा मुलगा ‘डॉन’ पाहिल्यानंतर मला भेटण्यासाठी थेट इंदूरहूनआला. मला भेटण्याची त्यांची जुनी इच्छा पूर्ण झाल्यावर तो रडला आणि खाली झुकून माझा नमस्कार केला. जे मला अजिबात आवडत नाही आणि त्यामुळे मी चिडलो.

पुढे अमिताभ बच्चन यांनी लिहिले की, “परंतु धापा टाकत धावत आल्यावर मी त्यांचे सांत्वन केले, माझ्या बनवलेल्या पेंटिंगवर ऑटोग्राफ दिला आणि त्यांच्या वडिलांचे पत्र मला वाचून दाखवले. हितचिंतक भावूक अशा प्रकारे हाेतात हे बघून मी एकांतात असताना अनेकदा विचार करायला लागतो की, हे सगळं माझ्यासोबत का? कसे? कधी?”

मेगास्टार यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेता अमिताभ बच्चन 80 वर्षांचे आहे, परंतु तरीही ते सिनेसृष्टीत सक्रिय आहे. त्यांचा ‘उंचाई’ हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर चांगली कमाई करत असून त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत अनुपम खेर, नीना गुप्ता, बोमन इराणी हे कलाकारही आहेत. (Bollywood actor amitabh bachchan fan breaks security to touch his feet actor shares pictures)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रणवीर सिंगसोबत सेल्फी घेणं पडलं माहागात!, ‘या’ पाक अभिनेत्रीला करावा लागला ट्रोलिंगचा सामना

‘माझा काही भरोसा नाही’, प्राजक्ता माळीने चाहत्याच्या कमेंटवर दिले हटके उत्तर

हे देखील वाचा