“लहान असो वा मोठा वाघ ‘वाघच’असतो” या टॅग लाईनखाली ‘बाल शिवाजी’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. खास बाब म्हजे ‘सैराट’ फेम अभिनेता आकाश ठोसर हा या चित्रपटात बाल शिवाजीच्या भूमिकेत दिसणार असून त्याचा पहिलाच लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.
बाल शिवाजी (Bal Shivaji) सिनेमाची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या सोहळ्यादिनी ‘बाल शिवाजी’ या सिनेमाचा फर्स्ट लूक आऊट करण्यात आला आहे. या सिनेमात ‘सैराट’ फेम आकाश ठोसर ‘बाल शिवाजी’च्या भूमिकेत दिसणार आहे. ( first poster of new upcoming marathi movie Bal Shivaji )
हेही वाचा – अमृता रावने सहन केलंय मूल गमावल्याचं दुःख, तब्बल चार वर्षे डॉक्टरांकडे फेऱ्या मारत होती अभिनेत्री
‘बाल शिवाजी’ या बहुचर्चित सिनेमात शिवरायांचा वयवर्षं 12 ते 16 पर्यंत त्यांच्या आयुष्यात घडलेल्या रंजक गोष्टी पाहायला मिळतील. त्यामुळे आता छत्रपती शिवरायांच्या बालपणीचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. मराठीत अनेक सुपरहिट सिनेमे देणारे दिग्दर्शक रवी जाधव हेच या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत.
View this post on Instagram
“माझा सिनेमा छत्रपती शिवाजी महाराजांचे आई-वडील, जिजामाता आणि शहाजी राजे भोसले यांनी लहानपणी त्यांचा भक्कम पाया रचून दिलेले अमूल्य योगदान दाखवेल. तसेच लहानपणापासूनच एक योद्धा आणि शासक म्हणून त्यांची कौशल्ये कशी तीक्ष्ण झाली हे दाखवेल,” असे या चित्रपटाबद्दल बोलताना रवी जाधव म्हणाले.
अधिक वाचा –
– बॉलिवूडमधील लोकप्रिय असणाऱ्या ‘या’ कलाकारांना क्वीन एकता कपूरने केले लाँच
– सैनिकांचा अपमान ते महाभारतातील द्रौपदीला लावला टॅटू, एकता कपूरचे ‘हे’ कार्यक्रम सापडले होते वादाच्या भोवऱ्यात