Saturday, September 7, 2024
Home नक्की वाचा दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटीलच्या लेकाने बदलले आपले नाव; आता प्रतीक बब्बर नाही तर ‘हे’ असणार नाव

दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटीलच्या लेकाने बदलले आपले नाव; आता प्रतीक बब्बर नाही तर ‘हे’ असणार नाव

कलाक्षेत्रातील एक व्यक्ती जरी आज काळाच्या पडद्याआड गेलेली असली तरीही तिचं नाव मात्र कुणीही आणि कधीही विसरु शकणार नाही, ती व्यक्ती म्हणजे अभिनेत्री स्मिता पाटील. अस्सल अभियन कौशल्यामुळे स्मिता पाटील यांचे नाव आजही आदराने घेतले जाते. स्मिता पाटील या जशा अभियनामुळे चर्चेत राहिल्या तशाच त्या त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिल्या. अगदी स्मिता यांच्या प्रमाणेच त्यांचा मुलगा प्रतीक बब्बर हाही अभिनयासोबतच त्याच्या खासगी आयुष्यामुळे नेहमी चर्चेत राहतो.

खरे तर प्रतीकच्या जन्मानंतर स्मिता पाटील दगावल्या. प्रतीकला जन्म दिला तरीही त्याचा सांभाळ करण्यासाठी त्या या जगात नव्हत्या. स्मिता पाटील आणि राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बर आता सिनेसृष्टीत नाव कमावण्यासाठी प्रयत्न करतोय. परंतू त्याला तितके यश किंवा प्रसिद्धी मिळताना दिसत नाही. परंतू आई वडील यांच्या प्रमाणेच मुलगा प्रतीक देखील त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहतो आणि सध्या तो चर्चेत आहे ते त्याच्या बदलेल्या नावामुळे. ( prateik babbar pays tribute to late mom smita patil changes his name )

हेही वाचा – सैनिकांचा अपमान ते महाभारतातील द्रौपदीला लावला टॅटू, एकता कपूरचे ‘हे’ कार्यक्रम सापडले होते वादाच्या भोवऱ्यात

अभिनेता प्रतीक हा सध्या अनेक प्रोजेक्टवर काम करतोय. त्याचे अनेक सिनेमे येणार आहेत. दरम्यान प्रतिकने त्याचे नाव बदलल्याचे पाहायला मिळाले आहे. प्रतिक बब्बर हे नाव तो आजवर लावत होता, मात्र आता त्याने त्याच्या नावात बदल केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by prateik patil babbar (@_prat)

 अभिनेता प्रतीक बब्बर हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय आहे. तसेच त्याला टॅटू काढण्याचे देखील वेड आहे. स्मिता असं लिहिलेला एक टॅटू त्याच्या छातीवर आहे. प्रतीकची त्याची दिवंगत आई स्मिता यांच्यावर खुप श्रद्धा आहे, हे तो अनेकदा बोलतो. त्यामुळेच प्रतीकने आई स्मिताला अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली आहे. प्रतीकने त्याचे नावच बदलून ‘प्रतीक बब्बर’ ऐवजी ‘प्रतीक स्मिता बब्बर’ असे केले आहे. यापुढे आपल्याला असंच ओळखलं जाव असे त्याने म्हटले आहे.

अधिक वाचा –
– ‘थोडी सी जो पी ली है’, आमिरच्या गेट टुगेदर पार्टीत कपिलच्या गायकिने वेधले सर्वांच लक्ष, व्हिडिओ व्हायरल
– आहा कडचक ना! सईचे काळ्या सलवार सूटमध्ये स्टाईलिश फाेटाेशूट, एकदा पाहाच

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा