Saturday, June 29, 2024

‘मुन्नाभाई एमबीबीएस’ फेम अभिनेता अर्शद वारसी याने शेअर केला लग्नाचा रंजक किस्सा म्हणाला, ‘कोल्ड ड्रिंकमध्ये बियर….,’

अर्शद वारसी आज बॉलिवूडमधलं एक मोठं नाव आहे. दमदार अभिनयाने विनोदी आणि गंभीर भूमिकांमध्ये जीव ओतणाऱ्या अर्शदने स्टार होण्यापूर्वी खूप संघर्ष केला आहे. यासोबतच त्याची प्रेमकहानी खूप फिल्मी झाली आहे. 1999 मध्ये त्याने व्हीजे मारियासोबत दोनदा लग्न केले. त्याच्या संघर्षाच्या काळात मारियाने तीन वर्षे घर सांभाळले आणि पतीला साथ दिली. आज दोघांचीही कोट्यवधींची संपत्ती असून ते मुंबईत आनंदाने राहतात.

‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटाने अभिनेते संजय दत्त यांचे करियर तर वाचवले, पण अर्शद वारसी यालाही स्टार बनवले. या चित्रपटापूर्वी अर्शद वारसीने यशाच्या शोधात सात वर्षे सतत संघर्ष केला. 1996 मध्ये आलेल्या ‘तेरे मेरे सपने’ या सिनेमातून करिअरला त्याने सुरुवात केली. त्याची प्रेमकहाणीही अतिशय फिल्मी आहे. 14 फेब्रुवारी 1999 रोजी अर्शदने त्याची गर्लफ्रेंड मारिया गोरेटीसोबत लग्न केले.

अर्शद आणि मारिया यांची पहिली भेट 1991 मध्ये एका डान्स शोदरम्यान झाली होती. यानंतर दोघेही बराच काळ मित्र राहिले. पुढे दोघेही प्रेमात पडले. पण मारियाचे मन जिंकणे अर्शदसाठी इतके सोपे नव्हते. पहिल्यांदा प्रपोज केल्यानंतर त्याला मारियाने साफ नकार दिला होता. मारियाच्या मनातली काय चाललय हे जाणून घेण्यासाठी अर्शदने कोल्ड ड्रिंकमध्ये बियर मिसळून तिला प्रेमात पडण्याचाही प्रयत्न केला. मात्र, याचा काहीही परिणाम झाला नाही.

19 एप्रिल 1968 रोजी मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या अर्शद याचा फिल्मी जगाशी काहीही संबंध नव्हता. लहानपणापासूनच अभ्यासात साधारण असलेला बाकी गोष्टीत तो हुशार होता. त्याला कलेची आवड आहे. शालेय दिवसांपासूनच त्याला चित्रपटांचे वेड लागले. लहानपणापासूनच त्याला नृत्याची आवड होती.

अर्शद कॉलेजच्या काळातही नृत्य स्पर्धांमध्ये भाग घेत असे. नृत्याच्या दुनियेत नाव कमावणाऱ्या अर्शद वारसीला १९९१ साली मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये झालेल्या नृत्य स्पर्धेत परीक्षक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमात मारिया नावाच्या मुलीने असा डान्स केला की, तो पहिल्याच नजरेत मारियाच्या प्रेमात पडला होता.

यानंतर त्याने मारियाला आपल्या डान्सिंग ग्रुपचा भाग बनण्याची ऑफर दिली. मात्र तिने ती ऑफर नाकारली. 3 महिन्यांनंतर ते दोघे एका कॉमन फ्रेंडद्वारे पुन्हा भेटले. यादरम्यान त्यांची चांगली मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. मारिया एमटीव्ही शोची होस्ट बनली. यादरम्यान मारियाने अर्शदची मुलाखतही घेतली होती.

एका मुलाखतीत अर्शद याने त्याच्या प्रस्तावाचा एक किस्सा शेअर केला. ज्यामध्ये त्याने सांगितले की, एका टूर दरम्यान त्याला मारियासोबत दुबईला जाण्याची संधी मिळाली. याआधी अर्शदने मारियाला प्रपोज केले होते. ज्याला मारियाने नकार दिला होता. दुबईमध्ये अर्शदने मारियाच्या कोल्ड ड्रिंकमध्ये बिअर मिसळली जेणेकरून तिच्या मनतल जाणून घेता येईल. मारीयाही मंत्ल्या मनात अर्शद आवडायला लागला होता. तिनेही त्याचे प्रेम स्वीकारले होते. यानंतर दोघे जवळपास 8 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिले. 1999 मध्ये त्याने मारियाशी दोनदा लग्न केले. मारिया ख्रिश्चन कुटुंबातून आली आहे, म्हणून पहिले लग्न चर्चमध्ये झाले. यानंतर अर्शदने मारियाशी लग्नही केले.

1996 मध्ये अर्शदचा डेब्यू चित्रपट ‘तेरे मेरे सपने’ बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही. संघर्षाच्या काळात आर्थिक विवंचनेशी झगडत असलेल्या अर्शदच्या पत्नीने त्या काळात त्याची काळजी घेतली. तसेच तिने 3 वर्षे स्वतः काम करून आर्थिक परिस्थिती सांभाळली. त्याच्या संघर्षाच्या दिवसात तिने मदत केली. मात्र, लग्नानंतर काही वर्षांनी त्याचे चित्रपट हिट होऊ लागले. त्याने कॉमेडीच्या दुनियेतही खूप नाव कमावले आणि स्टार बनला. आता अर्शद आणि मारिया मुंबईत आनंदी जीवन जगत आहेत. (bollywood-actor-arshad-warsi-about-lovestory-and-struggle)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अभिनेत्री सुश्मिता सेन हिने सांगितला मिस युनिव्हर्स स्पर्धेचा रंजक किस्सा म्हणाली, ‘मला तेव्हा एवढी….,’
oscars 2023 live stream: RRR ला अवॉर्ड जिंकताना बघायचे आहे? ऑस्कर लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे आणि कसे पहायचे ते जाणून घ्या

हे देखील वाचा