Friday, May 24, 2024

सुंबूलला शालीनचे वेड; सलमान खानने रागवल्यानंतर ढसाढसा रडत ‘इमली’ म्हणाली, ‘मला घरी…’

छाेट्या पडद्यावरील वादग्रस्त आणि तितकाच लाेकप्रिय असलेला शाे ‘बिग बाॅस 16‘च्या ‘वीकेंड का वार‘मध्ये आगामी भागात बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान पुन्हा एकदा जबरदस्त अवतारात दिसणार आहे. या वीकेंडच्या वारमध्ये दबंग खान शालीन आणि सुंबूल तौकीर यांच्यासह अनेक स्पर्धकांवर संतापताना दिसणार आहे. सलमान सुंबूलवर तिचा सह-स्पर्धक शालीन भानोटसोबतच्या मैत्रीवर टीका करताना दिसणार आहे. ज्यावर सुंबुल आणि शालीन त्यांचे स्पष्टीकरण सादर करताना दिसणार आहेत. मात्र, सलमान खान त्यांच्याशी सहमत नसून त्यांचा चांगलाच क्लास घेताना दिसणार आहे.

प्रोमोमध्ये सलमान खान (Salman Khan) सुंबूल (Sumbul Touqeer) हिला सांगतो की, “ती शालीन भानोटबद्दल ओब्सेस्ड आहे.” यावर टीना दत्ता म्हणते की, ‘अरे हो.’ त्यानंतर सलमान पुढे म्हणताे की, “मला वाटते की, शालीनला याची पुरेपूर जाणीव आहे.” शालीन (shalin bhanot) यावर प्रतिक्रिया देत म्हणतो की, “ती माझ्यापेक्षा 20 वर्षांनी लहान आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

सुंबुल रडते ढसाढसा 
सलमान म्हणाला, “एवढी घट्ट मैत्री काय आहे? की, तू टीनाला तिच्याशी बोलण्यासाठी 5 मिनिटेही देत ​​नाहीस?” यानंतर सुंबुल ढसाढसा रडते आणि म्हणते, “मला घरी जायेचे आहे.” यावर सलमान म्हणताेे की, “जा मग, कोणी थांबवले आहे?”

याआधी सलमान खानने शालीन भानोत आणि एमसी स्टेन यांनाही फटकारले होते. यावर शालीनही सोफ्यावरून उठला आणि शो सोडण्याची धमकी देऊ लागला. यावर सलमान खाननेही त्याला घर सोडण्यास सांगितले. शालीनला सलमान खानने एमसी स्टेनशी झालेल्या भांडणाबद्दल फटकारले होते आणि त्याला ही गोष्ट आवडली नाही. (tv bigg boss 16 actor salman khan angry at sumbul touqeer khan says you are obsessed with shalin bhanot)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
पंकज त्रिपाठी साकारणार अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका, जाणून घ्या कधी प्रदर्शित होणार चित्रपट

आहा कडकच ना! संजनाचा हटके अंदाज वेधतोय सर्वांचे लक्ष, फोटो गॅलेरी पाहाच

हे देखील वाचा