Friday, April 26, 2024

पवित्रा पुनियाला झाली गंभीर दुखापत, तीन आठवडे बेडरेस्टचा सल्ला दिल्यानंतरही घेतला काम करण्याचा निर्णय

‘बिग बॉस १४’ फेम अभिनेत्री पवित्रा पुनियासोबत एक गंभीर अपघात झाला आहे. त्यानंतर डॉक्टरांनी तिला ३ आठवडे बेड रेस्टचा सल्ला दिला आहे. टीव्ही सीरियल ‘मीत’चा अभिनेता शगुन पांडेनंतर आता चाहत्यांना पवित्रा पुनियाच्या तब्येतीबद्दल काळजी वाटू लागली आहे. पवित्राच्या पायाला दुखापत झाली आहे, असे सांगितले जात आहे की. ती घर शिफ्ट करत असताना तिच्यासोबत ही घटना घडली आहे.

या घटनेची माहिती देताना पवित्राने माध्यमांना सांगितले की, ती तिच्या लिव्हिंग रूमची सेटिंग करत होती, तेव्हा सेंटर टेबलच्यावर ठेवलेला एक जड आरसा तिच्या हातावरून घसरला आणि तिच्या डाव्या पायावर पडला.

पवित्राने सांगितले की, “काच खूप जड होती आणि जेव्हा ती माझ्या हातातून घसरली आणि माझ्या पायावर पडली, तेव्हाच मला समजले की, ही जखम सामान्य नाही. संध्याकाळपर्यंत पाय सुजला आणि मला चालायला त्रास होऊ लागला.” तिने पुढे सांगितले की, “या घटनेच्या एक दिवसानंतर, मी एक्स-रेसाठी गेले आणि मला कळले की, लिगामेंट खूप खराब झाले आहे. त्यानंतर डॉक्टरांनी मला तीन आठवडे बेड रेस्टचा सल्ला दिला आहे.”

पवित्राला डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला असला, तरी २० ऑक्टोबरला तिचे शूट असल्याने ती तिच्या मूळ गावी दिल्लीला रवाना होणार आहे. या शूटबद्दल ती म्हणाली की, ती शूटिंग सोडू शकत नाही, कारण तिने या शूटसाठी वचन दिले आहे. त्यामुळे शूट रद्द करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पवित्राचे पुढील १० दिवस शूटिंग करण्याची योजना आहे, त्यानंतर ती आपल्या कुटुंबासह दिवाळी साजरी करणार आहे.

तिचा खास मित्र एजाज खानबद्दल बोलताना तिने सांगितले की, तो देखील शूटसाठी बाहेर आहे. ‘बिग बॉस १४’मध्ये पवित्र आणि एजाज एकत्र दिसले होते. सुरुवातीला दोघेही भांडताना दिसले, पण शोच्या अखेरीस दोघांनी कबूल केले की, त्यांचे नाते खूप खास आहे. दोघांची केमिस्ट्री पाहून घरातील सदस्यांनी त्यांना ‘लव्ह बर्ड्स’चा दर्जाही दिला होता.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-लग्नाच्या रिसेप्शनमध्ये केवळ ‘या’ अभिनेत्याला ओळखू शकले होते श्रीराम नेने, माधुरी दीक्षितने केला खुलासा

-पत्नीची प्रेग्नेंसी नाही, तर ‘हे’ आहे शो बंद करण्यामागचं खरं कारण; कपिल शर्माचा मोठा खुलासा

-‘अधूरा’चा फर्स्ट लूक रिलीझ: शेवटचे एकत्र दिसणार ‘सिडनाझ’, चाहत्यांना अनावर झाल्या भावना

हे देखील वाचा