Friday, March 29, 2024

डिप्रेशनमध्ये होती अभिनेत्री! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासाेबत 15 दिवस आधी झाले हाेतं ब्रेकअप, वाचा संपूर्ण किस्सा

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या केली आहे की, तिची कोणी हत्या केली आहे? याप्रकरणी पाेलीस घटनेचा तपास घेत आहेत. पोलिसांनी तुनिषाचा सहकलाकार शीजान खान याला ताब्यात घेतले आहे. तुनिषाच्या कुटुंबीयांनी शीजानवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. आता एफआयआरची प्रत समोर आली आहे. या एफआयआरनुसार, तुनिषा शीजानसोबत रिलेशनशिपमध्ये होती. 15 दिवसांपूर्वी दोघांचे ब्रेकअप झाले होते, त्यामुळे ती तणावात होती.

एफआयआरच्या कॉपीमध्ये तुनिषा शर्मा (tunisha sharma) आणि शीजान खान (sheezan khan) रिलेशनशिपमध्ये असल्याचे लिहिले आहे. 15 दिवसांपूर्वी शीजानचे तिच्याशी ब्रेकअप झाले होते, त्यामुळे ती तणावाखाली राहू लागली. यामुळे ती डिप्रेशनमध्ये देखील होती. यामुळे तिने एवढे मोठे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tunisha Sharma (@_tunisha.sharma_)

तुनिषा शर्माच्या मृत्यूवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. उदाहरणार्थ, 24 तासात तुनिषा कोणासोबत बोलली? तुनिषा आणि शीजानमध्ये काय भांडण झाले? पोलिसांना माहिती देण्यास उशीर का झाला? शीझानची बहीण फलक नाझ हिला त्यांच्या भांडणाबद्ल काय माहिती होती का? भांडणात असे काय घडले की, तुनिषा एवढ्या तणावात आली? तुनिषाच्या आईने शीजानवर अत्याचार आणि छळ केल्याचा आरोप का केला,याचे कारण काय होते?

 

View this post on Instagram

 

A post shared by Tunisha Sharma (@_tunisha.sharma_)

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोस्टमार्टमच्या प्राथमिक तपासानुसार तुनिषाचा मृत्यू फाशीमुळे झाला आहे. तुनिषाने शेवटच्या वेळी फोनवर किंवा सेटवर ज्या लोकांशी बोलले त्या सर्वांचे जबाब नोंदवले जात आहेत.

तुनिशा ‘फितूर’, ‘बार बार देखो’, ‘कहानी 2: दुर्गा रानी सिंग’, ‘दबंग 3’ यांसारख्या दमदार चित्रपटांमध्येही दिसली होती. तुनिषाने ‘फितूर’ आणि ‘बार बार देखो’ मध्ये तरुण कॅटरीना कैफची भूमिका साकारली होती. कलर्स टीव्हीवरील तिची ‘इंटरनेट वाला लव’ ही मालिका चाहत्यांच्या पसंतीस उतरली हाेती.(tv actress tunisha sharma death case fir copy sheezan khan in relationship with actress)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ब्रेंकिग! प्रसिद्ध अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन, कलाविश्वावर शाेककळा

गळफास घेऊन आत्म’हत्या करणाऱ्या अभिनेत्रीचा अखेरचा व्हिडिओ व्हायरल, करत होती ‘हे’ कृत्य

हे देखील वाचा