Saturday, June 29, 2024

एक्स गर्लफ्रेंड सारासाेबतच्या ‘त्या’ व्हायरल फोटोंवर कार्तिक आर्यनने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

बाॅलिवूडचा लाेकप्रिय अभिनेता कार्तिक आर्यन याचा ‘शहजादा‘ चित्रपट प्रदर्शित झाला आहे.  चित्रपटाप्रमाणे अभिनेता त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. खरे तर, अलीकडेच अभिनेता सारा अली खानसाेबत उदयपूरमध्ये स्पॉट झाला हाेता. करिअरच्या सुरुवातीला कार्तिक आर्यन साराला डेट करत हाेता. या दाेन्ही स्टार्सच्या अफेअरची चर्चाही जाेरदार झाली. मात्र, नंतर त्यांचे ब्रेकअप झाले. अशात आता दाेघंही पुन्हा एकदा एकत्र दिसल्याने साेशल मीडिया युजर्सला अनेक प्रश्न पडत आहे, ज्यावर स्वत: अभिनेत्याने उत्तर दिले आहे. काय म्हणाला अभिनेता? चला जाणू घेऊया…

काही दिवसांपूर्वी सारा अली खान (sara ali khan) आणि कार्तिक आर्यन (karthik aryan) उदयपूरमध्ये एकमेकांशी गप्पा मारताना दिसले होते. यावेळी दोघांच्याही चेहऱ्यावर हसू होतं. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. आता कार्तिक आर्यनने यावर मौन साेडले आहे.

कार्तिक आर्यनने माध्यमाना दिलेल्या मुलाखतीत या विषयी सांगितले आहे. विशेष म्हणजे या दोघांनी ‘लव्ह आज कल’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. हा चित्रपट 2020 मध्ये आला होता. कार्तिक आर्यनला याविषयी विचारले असता तो म्हणाला, “आम्ही दोघे एकाच वेळी एकाच ठिकाणी होतो, त्यामुळे कोणीतरी तिथून फोटो काढला, फोटो काढणारे बरेच लोक होते. एक-दोनच फोटो आलेत याचे आश्चर्य वाटते.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

कार्तिक आर्यनला जेव्हा विचारण्यात आले की, ‘त्याला सारासोबत पुन्हा काम करायला आवडेल का?’ यावर कार्तिक आर्यनने आढेवेढे घेत सांगितले की, ‘सध्या तरी अशी कोणतीही अनाउंसमेंट झाली नाही आणि पुढचे माहिती नाही.’ लव आज कलच्या शूटिंगदरम्यान सारा अली खान आणि कार्तिक आर्यन एकमेकांच्या जवळ आले होते. दोघेही अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले. मात्र, नंतर दोघांचे ब्रेकअप झाले.(bollywood actor karthik aryan on the leaked photos with sara ali khan from udaipur claims it was a coincidence read news)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रभाससोबत डेटिंगच्या बातम्यांवर क्रितीने केला खुलासा, युजर्सला सांगितली ‘ही’ मोठी गोष्ट

कार्तिकचे चलन कापल्यानंतर मुंबई पाेलिसांनी केले ट्विट; युजर्स संतापून म्हणाले, ‘एखाद्या नेत्याकडे…’

हे देखील वाचा