Tuesday, June 18, 2024

कार्तिकचे चलन कापल्यानंतर मुंबई पाेलिसांनी केले ट्विट; युजर्स संतापून म्हणाले, ‘एखाद्या नेत्याकडे…’

अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या ‘शहजादा‘ चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 17 फेब्रुवारी 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या रिलीजच्या दिवशी कार्तिक त्याच्या आई-वडिलांसोबत बाप्पाच्या दर्शनासाठी सिद्धिविनायक मंदिरात गेला होता. तेथून परतत असताना मुंबई पोलिसांनी कार्तिक आर्यनला चलन भरायला सांगितेल. खरे तर, कार्तिक आर्यनच्या ड्रायव्हरने नो पार्किंग झोनमध्ये कार पार्क केली होती. अशाच या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी कार्तिकच्या कारचा फोटो ट्विटरवर शेअर केला असून त्यासोबत एक मजेदार कॅप्शनही लिहिले आहे.

मुंबई पोलिसांनी नुकतेच ट्विट करून लिहिले की, ‘प्रॉब्लम? प्रॉब्लेम असा होता की, गाडी चुकीच्या बाजूला पार्क केली होती! ‘शहजादे’ वाहतूक नियमांचे उल्लंघन करु शकतात असा विचार करण्याची चूक करू नका. याशिवाय मुंबई पोलिसांनी ‘रूल्स आजकल अॅॅन्ड फॉरएवर’ असा हॅशटॅग दिला आहे.

मुंबई पोलिसांचे हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. यावर युजर्सकडून अनेक मनोरंजक कमेंट येत आहेत. एका युजरने ट्विटरवर कमेंट करत लिहिले की, ‘हे चित्रपटाचे प्रमोशन आहे का?’

kartik Aaryan

मात्र, कार्तिकचे काही चाहते पोलिसांवर राग काढताना दिसत आहेत. एका युजरने विचारले की, ‘एखाद्या नेत्याकडे गाडी असती तरी त्याचे असे चलन कापले असते का?’, तर आणखी एका युजरने लिहिले की, ‘काही लोक खासगी वाहनांवर पोलिसांच्या नावाची पाटी लावतात, त्याचे काय?’

कार्तिक आर्यनच्या ‘शेहजादा’बद्दल बोलायचे झाले, तर हा चित्रपट अल्लू अर्जुनचा तेलगू चित्रपट ‘अला वैकुंठपुरमलो’चा रिमेक आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 6 कोटींचा व्यवसाय केला, तर दुसऱ्या दिवशीचे कलेक्शन 7 कोटी रुपये झाले आहे. या चित्रपटात कार्तिक व्यतिरिक्त क्रिती सेनन, परेश रावल आणि मनीषा कोईराला सारख्या प्रसिद्ध स्टार्सचा समावेश आहे.( mumbai police shares bollywood actor kartik car photo on twitter says do not do bhool that shehzadaas can flout traffic rules)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रभाससोबत डेटिंगच्या बातम्यांवर क्रितीने केला खुलासा, युजर्सला सांगितली ‘ही’ मोठी गोष्ट

पुन्हा एकदा अभिनेता शंतनू मोघे साकारणार महाराजांची भूमिका, ‘या’ सिनेमातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

हे देखील वाचा