Saturday, June 29, 2024

अर्रर्र! असे काय घडले की, कार्तिक आर्यनचे पोलिसांनी कापले चलन, जाणून घ्या कारण

अभिनेता कार्तिक आर्यनचा ‘शेहजादा‘ हा चित्रपट आज म्हणजेच शुक्रवारी (दि. 17 फेब्रुवारी)ला प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनानिमित्त कार्तिक आर्यन आज मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचला हाेता. येथे ताे गणपती बाप्पासमोर नतमस्तक झाला. पण, यादरम्यान कार्तिकचा खिशालाही कात्री लागली. नेमके काय आहे प्रकरण? चला जाणून घेऊया…

खरे तर, कार्तिकच्या ड्रायव्हरने नो पार्किंग झोनमध्ये कार पार्क केली होती, ज्यामुळे पोलिसांनी त्यांच्या गाडीचे चालान कापले. मात्र, अभिनेत्याचे किती चालान कापले गेले, ही माहिती अद्याप समाेर आली नाही. दंड भरल्यानंतर कार्तिक आर्यन तेथून निघून गेला.

कार्तिक आर्यनचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये अभिनेता आई-वडिलांसोबत बाप्पाच्या मंदिराच्या. यावेळी तो पांढऱ्या रंगाच्या कुर्ता-पायजमामध्ये दिसला. बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर कार्तिक आर्यन मंदिराजवळ पोहोचला. यावेळी त्याने त्याच्या चाहत्यांचीही भेट घेतली. अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर सिद्धिविनायकाच्या दर्शनाचा फोटो देखील पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तो बाप्पासमोर नतमस्तक होताना दिसत आहे. ‘बाप्पाच्या आशीर्वादाने आता शहजादा तुमचा’ असे त्याने फाेटाेसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

कार्तिकने ‘शेहजादा’ चित्रपटासाठी फी घेतली नाही. याचा खुलासा खुद्द अभिनेत्याने एका मुलाखती दरम्यान केला. तो म्हणाला, ‘या चित्रपटा पूर्वी मी निर्माता म्हणून आलो नव्हतो. त्यामुळे मी माझी फी घेतली होती, पण नंतर काही संकटे येऊ लागली. त्यामुळे संकाटाना पाहता कोणीतरी पुढाकार घेण्याची गरज होती. त्यामुळे मी माझ्या निर्मात्याला विचारले की, मी माझे पैसे देऊन देताे. अशातच मी चित्रपटाचा सहनिर्माता झालो आणि तिथून हे श्रेय आले.

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

‘शेहजादा’ हा अल्लू अर्जुनच्या तेलुगु चित्रपट ‘अला वैकुंठपुरमुलू’चा हिंदी रिमेक आहे. कार्तिक व्यतिरिक्त या चित्रपटात क्रिती सेनन, परेश रावल आणि मनीषा कोईराला यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, कार्तिकच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी 7.00 कोटी रुपयांची कमाई केली आहे.(bollywood actor kartik aaryan gets challan from mumbai police for flouting traffic rules as he visits siddhivinayak temple )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
नाैदल अधिकाऱ्याच्या मुलीने 14 वर्षात केले 19 चित्रपटांमध्ये काम, वाचा अभिनेत्रीचा रंजक प्रवास

तब्बू नाही तर ‘ही’ अभिनेत्री होती ‘हम साथ साथ है’साठी पहिली पसंती, सलमानमुळे नाकारावा लागला सिनेमा

हे देखील वाचा