Saturday, April 20, 2024

तब्बू नाही तर ‘ही’ अभिनेत्री होती ‘हम साथ साथ है’साठी पहिली पसंती, सलमानमुळे नाकारावा लागला सिनेमा

बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित ९० च्या दशकात प्रत्येक निर्मात्याची पहिली पसंत होती. प्रत्येक निर्मात्याला माधुरी त्याच्या सिनेमात नक्कीच पाहिजे होती, मात्र एक असे देखील निर्माते होते ज्यांना त्यांच्या प्रत्येक सिनेमातच माधुरी पाहिजे होती. ते निर्माते म्हणजे सूरज बडजात्या. माधुरी सूरज यांची फेव्हरेट होती. असाच एक मजेशीर किस्सा त्यांच्या बाबतीत इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध आहे.

Madhuri Dixit
photo courtesy: instagram/madhuridixitnene

हा किस्सा आहे १९९८ सालचा जेव्हा सूरज बडजात्या हम साथ साथ है बनवत होते. त्यांनी या सिनेमासाठी कलाकार शोधण्यास सुरुवात केली. त्यांना त्यांच्या सिनेमात माधुरी पाहिजे होती, मात्र त्यांच्या लक्षात येत नव्हते की तिला कोणत्या भूमिकेसाठी घ्यावे. माधुरीने याबद्दल स्वतः एका मुलाखतीमध्ये माहिती दिली होती. ती म्हणाली की ती सूरज यांच्या कोणत्याच सिनेमाला नाकारू शकत नव्हती. रस्ताही सूरज आणि माधुरी यांनी बसून तिला कोणता रोल देण्यात यावा यावर चर्चा केली. ती म्हणाली, “मी करिश्मा आणि सोनालीची भूमिका करू शकत नव्हती. हम एके है कोन केल्यानंतर मला सूरज यांच्यासोबत अधिक चांगली भूमिका करायची होती. अधिक दमदार रोल पाहिजे होता.”

पुढे निर्मात्यांनी तिला तब्बूच्या भूमिकेसाठी विचारले मात्र ‘हम आपके हैं कौन’नंतर ने अशक्य होते. कारण तब्बू सलमान खानच्या वाहिनीच्या भूमिकेत होती. त्यामुळे माधुरी आणि सलमान दीर भावजय या भूमिकेत दिसू शकले नसते. मग उरला रीमा लागू यांचा रोल त्यात ती फिट झाली मात्र ती त्यासाठी लहान होती. असे झाल्याने माधुरीने हा सिनेमा केला नाही. तत्पूर्वी हम साथ साथ है मध्ये मोहनीश बहल, तब्बू, सलमान खान, सोनाली बेंद्रे, सैफ अली खान, करिश्मा कपूर, आलोक नाथ, रीमा लागू, शक्ति कपूर आणि नीलम कोठारी मुख्य भूमिकेत होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आदिल तुरुंगात जाताच राखी अन् शर्लिनची पुन्हा झाली मैत्री, पाहा व्हायरल व्हिडिओ
भांड फुटलं रे! स्वरा भास्करने केले समाजवादी पक्षाच्या ‘फहाद अहमद’साेबत लग्न, पाहा व्हिडिओ

हे देखील वाचा