Friday, March 29, 2024

नाैदल अधिकाऱ्याच्या मुलीने 14 वर्षात केले 19 चित्रपटांमध्ये काम, वाचा अभिनेत्रीचा रंजक प्रवास

बाॅलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर सध्या तिच्या लग्नामुळे माेठ्या प्रमाणात चर्चेत आहे. अभिनेत्रीने गुरुवारी (दि. 16 फेब्रुवारी)राेजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून तिच्या लग्नाबद्दल चाहत्यांना माहिती दिली, ज्यामध्ये फहाद अहमदसोबतचा तिचा प्रवास दाखवण्यात आला आहे. भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्याच्या घरी जन्मलेली स्वरा तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते, परंतु तिचे नाव अनेकदा वादातही असते. चला तर मग स्वराच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील विविध पैलून विषयी जाणून घेऊया…

स्वरा भास्करचा जन्म 9 एप्रिल 1988 रोजी भारतीय नौदल अधिकारी चित्रयू उदय भास्कर यांच्या घरी झाला. तिची आई इरा भास्कर दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात सिनेमा अभ्यासाच्या प्राध्यापिका होत्या. स्वराने तिचे शालेय शिक्षण दिल्लीतील सरदार पटेल स्कूलमधून केले आहे, तर जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून मानसशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली आहे.

अभ्यासादरम्यान स्वराचं मन फक्त अभिनयात होतं. त्यामुळे तिने एनके शर्मा थिएटर ग्रुप जॉईन केला, ज्यानंतर शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वरा दिल्लीहून मुंबईत आली. 2009 मध्ये आलेल्या मोहनलाल कीप वॉकिंग या चित्रपटातून स्वराने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही. यानंतर तिला हृतिक रोशन आणि ऐश्वर्या राय स्टारर ‘गुजारिश’ चित्रपट मिळाला. या चित्रपटात स्वराने सहायक भूमिका साकारली होती.

मात्र,स्वरा भास्करला अजून ती ओळख मिळाली नव्हती, ज्याच्या शोधात ती मुंबईत आली होती. 2011 मध्‍ये आनंद एल रायच्‍या ‘तनु वेड्स मनू’ या चित्रपटाने स्वराला खरी ओळख मिळाली. या चित्रपटात स्वराने कंगना रनोतच्या बेस्ट फ्रेंडची भूमिका साकारली होती, ज्याचे समीक्षक आणि प्रेक्षकांनी भरभरुन कौतुक केले होते. या चित्रपटात स्वराला फिल्मफेअरसह अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्ये तिच्या भूमिकेसाठी नामांकन मिळाले होते.

स्वराने तिच्या 14 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये 19 चित्रपटांमध्ये काम केले आहे, ज्यामध्ये ‘रांझना’, ‘तनु वेड्स मनू’, ‘तनु वेड्स मनु रिटर्न्स’, ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटातील तिच्या कामाचे कौतुक झाले. हे असे चित्रपट आहेत ज्यांनी बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली. याव्यतिरिक्त स्वराने टीव्ही शो आणि वेब सीरिजमध्ये देखील काम केले आहे. तिने ‘संविधान’ आणि ‘रंगोली’ या शोचे सूत्रसंचालन केले आहे, ज्यामुळे तिला खुप प्रसिद्धि मिळाली.(bollywood actress swara bhasker did 19 films in 14 years comment on hijab controversy created ruckus)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
करण जोहरला बनायचे नव्हते चित्रपट निर्माता, ज्या मित्राने विचार बदलला त्याच्यापेक्षाही बनवले मोठे एम्पायर

तब्बू नाही तर ‘ही’ अभिनेत्री होती ‘हम साथ साथ है’साठी पहिली पसंती, सलमानमुळे नाकारावा लागला सिनेमा

हे देखील वाचा