Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्याच्या आईचे निधन!

बॉलिवूडमधी आपल्या दमदार अभिनयाच्या जिवावर यशाचे शिखर गाठणार प्रसिद्ध अभिनेता मनोज बाजपेयी. याने अनेक चित्रपटामध्ये आपल्या अभिनयाची धमक दाखवली आहे. त्याला इंडसट्रीमध्ये कोणत्याही ओळखीची गरज नाही. सतत चर्चेत असणारा अभिनेत्यासोबत नुकतंच एक द:खद बातमी समोर आली आहे. अभिनेत्याची आई गीता बाजपेयी यांचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले आहे. काही दिवसांपासून त्यांची तब्येत खराब झाली होती. त्यांमुळे त्यांना दिल्ली रुग्णालयात भर्ती केले होते. मात्र, गुरुवार (दि, 8 डिसेंबर) रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

प्रसिद्ध अभिनेता मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) याची आई गीता बाजपेयी (Geeta Bajpayee) यांना काही दिवसांपूर्वीच रुग्णालयात दाखल केले होते. हळू हळू त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा देखिल झाली होती. मात्र, डॉक्टर त्यांचा जिव वाचवण्यामध्ये अयशस्वी झाले. सतत व्यस्त असणारा अभिनेता आपल्या आईसाठी वेळात वेळ काढूण भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचला होता.

गेल्या वर्षीच मनोज बाजपेयीचे वडील राधाकांत बाजपेयी (Radhakant Bajpayee) यांचे निधन झाले होते. आणि आता आईनेही साथ सोडली आहे. अभिनेत्याचे आपल्या आईसोबत खुपच चांगले नाते होते. आपल्या आईची शिकवण मनोज नेहमी लक्षात ठेवत असतो. गीता बाजपेयी यांनी अभिनेत्याला सांगितले होते की, ‘जो यशस्वी होत नही, त्याला कधीच कमी समजू नये.’ मनोज अईच्या निधनामुळे खूपच दु:खी आहे. त्याला सतत पाठिंबा देणाऱ्या आईचा हात डोक्यावरुन गेला आहे. त्यांुळे अभिनेत्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘क्या कीजे’ गाण्याचा नवीन अल्बम, प्रतिभा सिंग यांच्या आवजात ऐकाल अपूर्ण लव्हस्टोरी
ही तर हाईटच झाली! प्रमोशन करण्यासाठी थेट अभिनेत्रीच्या पायात पडला प्रसिद्ध दिग्दर्शक

हे देखील वाचा