Sunday, May 19, 2024

भावनिक नोट! दु:खाचा डोंगर कोसळल्यावर मनाेज बाजपेयींने आईला संबाेधले, ‘आयर्न लेडी’

अभिनेता मनोज बाजपेयी यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मनोज बाजपेयी यांची आई गीता देवी यांनी 8 डिसेंबर रोजी या जगाचा कायमचा निरोप घेतला. आईच्या जाण्याने मनोज बाजपेयींना खूप मोठा धक्का बसला आहे. अलीकडेच, सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून, या अभिनेत्याने त्याची आई गीता देवी यांना प्रेम आणि आदराने श्रद्धांजली वाहिली आहे. मनोजने आपल्या आईला एक लांबलचक भावनिक नाेट लिहिली असून त्यात त्याने आईला ‘आयर्न लेडी’ असे संबोधले आहे.

मनोज (manoj bajpayee) त्याच्या पोस्टमध्ये लिहिताे, “आयर्न लेडी, माझ्या आईला माझी श्रद्धांजली. 6 मुलांची आई आणि एका शेतकऱ्याच्या पत्नीने नेहमीच तिच्या संपूर्ण कुटुंबाचे सर्व प्रकारच्या दुष्ट आत्म्यांपासून आणि या स्वार्थी जगापासून संरक्षण केले. तिने नेहमीच स्वतःच्या इच्छा आणि गरजांकडे दुर्लक्ष करून आपल्या पतीला पुर्णपणे पाठिंबा दिला आणि तिच्या प्रत्येक मुलाच्या सर्व गरजांची काळजी घेतली.

मनोज पुढे लिहितात, “माझी इच्छा आहे की, मी वेळ मागे वळून माझ्या आईला खूप सशक्त होताना पाहू शकलो असतो. त्यांचे आमच्या कुटुंबासाठी आणि आमच्या सर्वांच्या जीवनात असंख्य योगदान आहेत. त्या सर्व योगदानाबद्दल मी त्यांचा सदैव ऋणी राहीन. माझ्या संघर्षाच्या दिवसात ती माझी हिम्मत बनली, त्यांनी कधीही हार न मानण्याची हिंमत दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manoj Bajpayee (@bajpayee.manoj)

या नाेटमध्ये मनोज बाजपेयीने आपल्या यशाचे श्रेय आईला दिले आहे. ताे त्याच्या आईची सावली आहे असे सांगताे. तो सर्व काही त्याच्या आईकडून शिकला आहे. त्याच्या आईनेच त्याला आयुष्यातील कठीण प्रसंगांनाही धैर्याने तोंड द्यायला शिकवले.

‘द फॅमिली मॅन’ फेम मनोज बाजपेयी यांची आई गीता देवी यांना जवळपास 20 दिवस दिल्लीतील मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आजाराशी दीर्घकाळ लढा दिल्यानंतर वयाच्या 80 व्या वर्षी 8 डिसेंबर रोजी सकाळी त्यांचे निधन झाले. (bollywood actor manoj bajpayee shares emotional note paying tribute to late mother gita devi )

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
काय सांगता! नोराने जॅकलीन विरोधात दाखल केला मानहानीचा खटला; म्हणाली, ‘बदनाम करण्याचा प्रयत्न…’

‘काय बघता, कोंबडी- मटण पाठवा माझ्यासाठी…’, राखीचा ‘बिग बाॅस मराठी’मध्ये जोरदार ड्रामा; व्हिडिओ पाहाच

हे देखील वाचा