Saturday, March 2, 2024

असे काय घडले की, मिथुन चक्रवर्तीने बायाेपिक बनवण्यास दिला नकार

मिथुन चक्रवर्ती हे हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहेत, ज्यांनी हिंदी सिनेसृष्टीला आपल्या अभिनयाच्या बळावर अनेक दमदार चित्रपट दिले आहेत. आत्तापर्यंत अनेक कलाकारांच्या बायोपिक बनवण्याची चर्चा होती, अशा परिस्थितीत मिथुन चक्रवर्ती यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्याची चर्चा रंगू लागली. यावर अभिनेत्याने स्पष्ट नकार दिला असून याचे कारणही सांगितले आहे.

तर झाले असे की, टीव्हीच्या प्रसिद्ध सिंगिंग रिऍलिटी शो ‘सा रे गा मा पा लिटिल चॅंप’च्या डिस्को किंग एपिसोडमध्ये, अभिनेता मिथुन चक्रवर्ती (mithun chakraborty) यांनी त्याच्या संघर्षाच्या दिवसांची आठवण करून दिली आणि सांगितले की, “त्यांनी पाहिलेले दिवस इतर कोणीही पाहू नयेत.” यासोबतच त्यांनी बॉलीवूड इंडस्ट्रीत पदार्पण करण्यापूर्वी सुरुवातीच्या दिवसांबद्दल अनेक गोष्टींचा खुलासा केला आणि त्यांच्यावर बायोपिक का बनवू इच्छित नाही हे देखील सांगितले.

मिथुन चक्रवर्ती म्हणाले, “माझ्या आयुष्यातून कोणीही जाऊ नये अशी माझी इच्छा आहे, प्रत्येकाने संघर्षाचे दिवस पाहिले आहेत पण माझ्या त्वचेच्या रंगामुळे मला अपमानित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. बर्याच वर्षांपासून माझ्या त्वचेमुळे माझा अपमान झाला. मला रिकाम्या पोटी झोपावे लागत आणि स्वत:हून झाेपायसाठी मी रडत हाेताे.”

यासोबतच मिथुन यांनी सांगितले की, “असे काही दिवस होते जेव्हा मला पुढचे जेवण काय असेल आणि कुठे झोपायचे हे माहित नव्हते.” ते पुढे म्हणाले, “मी कधी-कधी  फुटपाथवरही झोपत होताे” आणि त्यामुळेच मिथुन चक्रवर्ती यांना त्यांचा बायोपिक किंवा त्यांच्या जीवनावर आधारित कोणताही चित्रपट बनवायचा नाही, कारण ते म्हणाले की, “याने कोणाला प्रेरणा तर मिळणार नाही, पण मानसिकदृष्ट्या ताेडून टाकेल.” यासोबतच ते सेटवर म्हणाले की, “प्रत्येकाने आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी खूप प्रयत्न करावेत, जर मी करू शकलो तर कोणीही करू शकतो.”

मिथुन चक्रवर्ती यांच्या कारकीर्द विषयी बाेलायचे झाले तर, मिथुन यांनी ‘दादा’, ‘डान्स डान्स’, ‘मर्द’, ‘द कश्मिर फाईल’ यासारखे दमदार चित्रपट बाॅलिवूडला दिले. (bollywood actor mithun chakraborty wants no biopic over his life know reasons and full story in hindi)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘अडीच वर्षांपूर्वी केला अर्ज’, अक्षय कुमारला भारतीय पासपोर्ट मिळण्यास का हाेताेय उशीर?

अबब! अमिताभ बच्चन ब्लॉगमध्ये म्हणाले, ‘मी राकेश कुमारच्या अंत्ययात्रेला जाणार नाही’

हे देखील वाचा