Friday, January 27, 2023

पीयूष मिश्रांची बॉलीवूड दिग्दर्शकांवर टीका; म्हणाले, ‘त्यांच्यात बुद्धी…’

‘गँग्स ऑफ वासेपूर’ फेम अभिनेता पीयूष मिश्रा त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. मात्र, यासोबतच पियुष मिश्रा त्यांच्या वक्तव्यांमुळेही चर्चेत असतात. नुकतेच पीयूष मिश्रा यांनी असे काही वक्तव्य केले आहे, ज्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले आहे. खरं तर, नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत, अभिनेत्याने दक्षिण भारतीय चित्रपट दिग्दर्शकांचे कौतुक करत बॉलिवूड दिग्दर्शकांचा क्लास घेतला आहे.

अलीकडेच एका मुलाखतीत अभिनेता पीयूष मिश्रा (piyush mishra) यांनी सध्या प्रदर्शित होत असलेले हिंदी चित्रपट आणि त्यांच्या दिग्दर्शकांबद्दल संताप व्यक्त केला आहे. एका संस्थेशी बोलताना अभिनेता म्हणाले,”दक्षिण भारतीय फिल्म इंडस्ट्रीतील दिग्दर्शकांमध्ये बॉलीवूडच्या दिग्दर्शकांपेक्षा जास्त बुद्धी आहे, ते बाॅलिवूड दिग्दर्शकांच्या तुलनेत जास्त हुशार आणि अधिक कल्पक आहे. आपण नेहमी एकाच सूत्रावर काम करतो हा आपला मूर्खपणा आहे.”

पीयूष मिश्रा आपला मुद्दा पुढे करत म्हणाले, ‘पुष्पासारखे दक्षिण भारतीय चित्रपट अनेक ऍक्शन आणि लक्षवेधी दृश्यांसह त्यांच्या जुन्या फॉर्म्युलावर आधारित आहे, परंतु ते प्रेक्षकांसमोर नवीन पद्धतीने सादर करतात. मी शंकरसोबत ‘इंडियन 2’ नावाच्या दक्षिण भारतीय चित्रपटातही काम केले आहे. त्याच्यासोबत काम करण्याचा माझा पहिला अनुभव मला जाणवला की, ते किती इनोवेटिव आहे. ते एकच संकल्पना वेगवेगळ्या प्रकारे मांडतात आणि संस्कृतीचे उत्तम प्रतिनिधित्व करतात.” अभिनेत्याने असेही सांगितले की, “तामिळ आणि मल्याळम सारख्या दक्षिण भारतीय भाषा खूप जुन्या भाषा आहेत आणि खूप जुन्या संस्कृतींचा भाग आहेत, त्यामुळेच तिथले चित्रपट निर्माते त्यांच्या चित्रपटांच्या तपशीलांवर खूप छान संशोधन करतात.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Piyush Mishra (@officialpiyushmishra)

यावर पीयूष मिश्रा यांना, लोकांच्या जीवनावर खोलवर परिणाम करणारे असे चित्रपट अजूनही बनवले जात आहेत का? असे विचारले असता ते म्हणाले, “उत्तर भारतात असा कोणताही चित्रपट बनत नाही.”

आपल्या संभाषणात पीयूषने बॉलिवूड दिग्दर्शक राजकुमार हिरानी आणि त्याच्या ‘3 इडियट्स’ चित्रपटाचेही कौतुक केले आहे. अलीकडच्या काळात भारतात चित्रपटांविरोधात बहिष्कार टाकण्याच्या प्रवृत्तीबद्दल आपले मत व्यक्त करताना अभिनेते म्हणाले, “हे काही प्रमाणात बरोबर आणि काही प्रमाणात चुकीचे आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Piyush Mishra (@officialpiyushmishra)

अभिनेता पीयूष मिश्रा यांच्या अभिनय काराकिर्दी विषयी बाेलायचे झाले, तर त्यांनी ‘आजा नचेल’, ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘हॅपी भाग जायेगी’ यासारख्या दमदार चित्रपटांमध्ये काम केले आहे. (bollywood actor piyush mishra slams bollywood films claiming south directors intelligent)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अर्रर्र! ‘या’ अभिनेत्रीने उचलले मोठे पाऊल, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेला ठोकला रामराम

‘जीव माझा गुंतला’ मालिकेच्या सेटवर प्रसिद्ध अभिनेत्याचा अपघात; म्हणाला, ‘…डोळा थोडक्यात बचावला’

हे देखील वाचा