Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

अशा प्रकारे राजकुमार पहिल्यांदा भेटला शाहरुखला, अभिनेत्याने शेअर केला मजेदार किस्सा

बॉलिवूडचा लाेकप्रिय अभिनेता शाहरुख खान याचे जगभरात चाहते आहेत. सामान्य लोकच नाही तर मोठे नेते, खेळाडू आणि अभिनेतेही त्यांचे चाहते आहेत. सारा अली खान, सिद्धांत चतुर्वेदी यांच्यासह आजच्या पिढीतील अनेक कलाकार त्यांचे चाहते आहेत. सध्याच्या काळातील सर्वात प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक, राजकुमार राव हा देखील शाहरुखचा मोठा चाहता आहे. अशातच शाहरुखला पहिल्यांदा भेटल्याचा अनुभव त्याने शेअर केला आहे.

अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao ) याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो स्टँड-अप कॉमेडियन झाकीर खान (Zakir Khan)याला शाहरुखसोबतच्या पहिल्या भेटीचा अनुभव सांगत आहे. व्हिडिओमध्ये राजकुमार म्हणतो, “मी 2014 साली शाहरुख सरांना पहिल्यांदा भेटलो. मी कुठेतरी शूटिंग करत होतो आणि तेही प्रमोशनसाठी तिथे आले होते. म्हणून मला वाटले की, मला त्यांना भेटायचे तर आहे. कारण, मी त्यांना पाहून माेठा झालाे आणि त्यांच्या कडूनच शिकलाे. म्हणून त्यांना मी मेसेज केला आणि दिग्दर्शक शकुन बत्रा यांनी मला फोन केला. जेव्हा मी व्हॅनिटीमध्ये प्रवेश केला तेव्हा आयुष्य अगदी हाय स्पीड झाले. मी हळूच दरवाजा उघडतो व कॅमेरा त्यांच्या दिशेने जाताे… आणि आयी कैसी रात (हे गाणं)…”

 

View this post on Instagram

 

A post shared by Netflix India (@netflix_in)

राजकुमार पुढे म्हणाला, “ शाहरुख खान तिथे बसले होते. त्यांनी अचानक बघितले आणि म्हणाले, ‘अरे यार राज, ये, ये.’ ज्याला मी होर्डिंग्जवर, बसमध्ये धक्का खाताना बघायचाे. ते मला नावाने हाक मारत होते, ‘राज ये ये.’ मी पूर्णपणे ब्लॅंक झालाे आणि ते किती चार्मिंग आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे.”

शाहरुखने पुढे राजकुमारला ‘शाहिद’ चित्रपटासाठी मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल त्यांचे अभिनंदन केले. राजकुमारने सांगितले की, “शाहरुख खानला माझ्याबद्दल सर्व काही माहित आहे. हा माझ्यासाठी सर्वात आनंदाचा क्षण होता.”

राजकुमार राव अलीकडेच थ्रिलर ‘मोनिका ओ माय डार्लिंग’ मध्ये हुमा कुरेशी आणि राधिका आपटे यांच्यासोबत दिसला होता, जो ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रसारित झाला होता. राजकुमार लवकरच दिग्दर्शक जोडी राज आणि डीके यांच्या ‘गन्स अँड गुलाब’ या चित्रपटातही दिसणार आहे. (bollywood actor rajkummar rao first meet to shah rukh khan watched this video)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
नव्या नवेली नंदा सिद्धांतला करतेय डेट? बिग बींची नात दिसली अभिनेत्याच्या घराबाहेर

कर्करोगाशी लढत असलेल्या अभिनेत्रीची इमोशनल पोस्ट चर्चेत; म्हणाली,’टक्कल पडलेल्या मॉडेलचे फोटोशूट…’

हे देखील वाचा